Join us

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली अन् टीम इंडिया फुटली, त्यामागचं कारण एकच...

कोच एका विमानतळावर उतरला. कॅप्टन दुसऱ्या अन् अन्य खेळाडू ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:00 IST

Open in App

दुबईच्या मैदानात भारतीय संघानं तिसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकत इतिहास रचला. विक्रमी तिसऱ्यांदा ही मिनी वर्ल्ड कप स्पर्धा गाजवताना टीम इंडियानं सातवी आयसीसी ट्रॉफी पटकावली. दुबईत खेळाडूंचा जल्लोष पाहायला मिळाला.  देशभरातील वेगवेगळ्या शहरातही क्रिकेट चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दुबईतून मायदेशात परतल्यावर चॅम्पियन्स टीम इंडियाचं स्वागतही अगदी दणक्यात होईल, असे वाटत होते. कारण टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संघानं आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकलीये. त्यावेळीचा अंदाज पुन्हा दिसेल, अशी चर्चा  रंगत असताना दुबईत ट्रॉफी जिंकली अन् टीम फुटली. त्यामुळे जंगी स्वागत वैगरे गोष्ट काही पाहायलाच मिळाली नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टीम फुटली, कोच एकीकडे कॅप्टन दुसरीकडे अन्... इतर खेळाडू तिसरीकडे

कोच एका विमानतळावर उतरला. कॅप्टन दुसऱ्या अन् अन्य खेळाडू तिसरीकडेच असे चित्र पाहायला मिळाले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघ एकत्रितच दुबईला पोहचाल. पण जेतेपद जिंकल्यावर भारतीय संघातील खेळाडूंनी एकत्रित मायदेशी परतण्याऐवजी आपापल्या सोयीनुसार, थेट घरी पोहचण्याला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाचा कोच गौतम गंभीर दिल्लीच्या विमानतळावर स्पॉट झाला. त्याने गुपचूप कारमध्ये बसून घरचा रस्ता धरल्याचे पाहायला मिळाले. 

रोहितभोवती गर्दी जमली, पण...

कॅप्टन रोहित शर्मा हा मुंबईच्या विमानतळावर उतरला. त्याच्या एन्ट्री झाल्यावर त्याची झलक पाहण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी दिसली. पण ग्रँड वेलकम वैगेरेची गोष्ट इथंही दिसली नाही. रिषभ पंत वरुण चक्रवर्तीसह अन्य खेळाडूही मायदेशात परतले. पण कोणच एकत्रित स्पॉट झाले नाही. 

यामागचं कारण एकच... दुबईत एकत्र खेळले आता इथं एकमेकांविरुद्ध भिडायचंय

भारतीय संघ गेल्या काही दिवसांपासून सातत्याने क्रिकेटमध्ये व्यग्र असल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलिया दौरा मग चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्धची मालिका खेळून टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना झाली होती. त्यात आता २२ मार्च पासून आयपीएलच बिगूल वाजतंय. दुबईत एकत्रित मैदानात उतरलेले भिडू आता या स्पर्धेत आपापल्या फ्रँचायझी संघाकडून खेळताना दिसणार आहेत. ही स्पर्धा जवळपास २ महिने चालणार आहे. त्यामुळेच कदाचित बीसीसीआयने खेळाडूंना एकत्रित आणण्यापेक्षा आपपल्या सोयीनुसार, थेट घरी जाण्याची परवानगी दिल्याचे दिसते. अधिकृतरित्या यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आली नसली,  तरी हेच कारण आहे ज्यामुळे ना ग्रँड वेलकमचा प्लान आखण्यात आलाय ना संघातील खेळाडू एकत्रित मायदेशी परतलेत. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५इंडियन प्रिमियर लीग २०२५रोहित शर्मारिषभ पंतगौतम गंभीर