IND vs SA 3rd ODI Rohit Sharma And Kuldeep Yadav's Funny Banter Over DRS Call विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवनं आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिली. दक्षिण आफ्रिकेच्या डावात एनिगडीच्या रुपात त्याने सामन्यातील चौथी विकेट घेतली. पायचितच्या रुपात ही विकेट आपल्या खात्यात जमा करण्याआधी तो KL राहुलकडे DRS घेण्यासाठी जोर लावताना पाहायला मिळाले. पण रोहित शर्मा पिक्चरध्ये आला अन् कुलदीपवर माघार घेण्याची वेळ आली.
कुलदीपनं DRS ची मागणी करताच रोहित पुढे आला अन्...
गोलंदाजाने केलेल्या अपीलनंतर DRS घ्यावा की, नाही याचा कॉल कर्णधाराला घ्यायचा असतो. पण कुलदीपनं DRS साठी उत्सुकता दाखवल्यावर रोहित शर्माने त्याला आउट नाही गोलंदाजी कर असे सांगितले. मैदानातील हा क्षण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी कोहलीनही रोहितची साथ देत चेंडू स्टंपच्या वरुन जात असल्याचा इशारा केल्याचे पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं? कुलदीपनं DRS मागताच हिटमॅन रोहित कॅप्टनच्या तोऱ्यात पुढाकार घेत त्याला माघारी धाडण्यामागचं कारण काय जाणून घेऊयात सविस्तर
नेमकं कधी अन् काय घडलं?
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील ४४ व्या षटकात कुलदीप यादव आपल्या कोट्यातील अखेरच षटक घेऊन आला. दुसऱ्याच चेंडूवर त्याने एनिगडीच्या विरोधात पायचितची अपील केली. विकेटमागे असलेल्या लोकेश राहुलनंही त्याच्या सूरात सूर मिसळत अपील केली. पण कुलदीपनं DRS ची डिमांड करताना स्लीपमध्ये असलेला रोहित शर्मा हसू लागला. आउट नाही, चल गोलंदाज कर.. असे म्हणत त्याने रिव्ह्यू वाया घालवण्याचा कुलदीपचा डाव हाणून पाडला. रोहितला विराटचीही साथ मिळाली. रिप्लेमध्ये रोहित-विराटचा निर्णय रिव्हू न घेण्याचा निर्णय अगदी योग्य होता ते सिद्ध झाले. याच षटकात शेवटी पायचितच्या स्वरुपात कुलदीपनं एनिगडीच्या रुपात चौथी विकेट आपल्या खात्यात जमा केल्याचे पाहायला मिळाले. रोहित सध्या संघाचा कर्णधार नसला तरी कुलदीचा त्याला चांगला अनुभव आहे. त्यामुळेच कुलदीपनं रिव्ह्यूची मागणी करताच रोहित सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले.
कुलदीपनंही सांगितली त्यामागची गोष्ट
दक्षिण आफ्रिकेचा डाव संपल्यावर कुलदीप यादवनंही रिव्ह्यू मागची स्टोरी शेअर केली. मी रिव्ह्यूच्या बाबतीत वाईट निर्णय घेतो. एका गोलंदाजाच्या रुपात फलंदाज नॉट आउट असला तरी तो आउट आहे, असाच मी विचार करतो, असे सांगत रोहित शर्माला ही गोष्ट चांगलीच ठावूक असल्याची गोष्ट शेअर करत फिरकीपटून चर्चित मुद्यावर प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले.
Web Summary : During the IND vs SA ODI, Kuldeep Yadav's eagerness for a DRS review was humorously denied by Rohit Sharma, who felt it was not out. Kohli also supported Rohit. Kuldeep later took the wicket, acknowledging Rohit's experience-based guidance.
Web Summary : IND vs SA ODI में, कुलदीप यादव की DRS रिव्यू की उत्सुकता को रोहित शर्मा ने हास्यपूर्ण ढंग से नकार दिया, क्योंकि उन्हें लगा कि यह आउट नहीं है। कोहली ने भी रोहित का समर्थन किया। बाद में कुलदीप ने विकेट लिया, और रोहित के अनुभव-आधारित मार्गदर्शन को स्वीकार किया।