Join us

Rishabh-Urvashi: 'उर्वशी बुलाती है मगर...', सूर्यकुमारने शेअर केला फोटो; चाहत्यांनी घेतली पंतची मजा

Rishabh-Urvashi: टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियात गेला आहे. उर्वशी रौतेलादेखील त्याच्या मागेमागे ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 15:23 IST

Open in App

Rishabh Pant Urvashi Rautela: टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचे कारण स्वतः उर्वशी रौतेलाच आहे. आधी पंतवर टीका करणाऱ्या उर्वशीने त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ती त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. ऋषभ सध्या टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियात आहे. इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने टीमसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर चाहते ऋषभची मजा घेत आहेत.ऋषभ पंतला चाहत्यांचा सल्ला सूर्यकुमार यादवने शेअर केलेल्या फोटोमध्ये ऋषभ पंत, कर्णधार रोहित शर्मा, युजवेंद्र चहल आणि कंडिशनिंग कोच सोहम देसाई दिसत आहेत. सूर्याने हा फोटो शेअर करताना पंतलाही टॅग केले. मग काय, यावर चाहत्यांनी पंतची चांगलीच खिल्ली उडवली. एका यूजरने कमेंट करताना लिहिले, 'वाह भाऊ, आज आग लावून टाकली. ऋषभला सांगा, उर्वशी बोलावले, पण जायचे...' यासोबत युजरने हसणारा इमोजीही शेअर केला. आणखी एका यूजरने लिहिले की, 'ऋषभ भाऊला लपवा, बाहेर जाऊ देऊ नका. उर्वशीने पाहिले तर जादूटोणा करेल.'ऋषभ आणि उर्वशीत नेमका काय वाद?उर्वशी आणि पंत यांच्यातील वाद स्वतः उर्वशीने सुरू केला होता. एका मुलाखतीत उर्वशीने अप्रत्यक्षपणे ऋषभचे नाव घेत म्हटले होते की, 'एक क्रिकेटर हॉटेलच्या लॉबीमध्ये 10 तास माझी वाट पाहत होता.' उर्वशीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतनेही तिला टोमणे मारणारी एक इन्स्टा स्टोरी टाकली होती. ऋषभ पंतने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये नाव न घेता लिहिले- 'ताई माझा पाठलाग करणे सोड.' मात्र, ऋषभने इन्स्टा स्टोरी लगेचच डिलीट केली.सामना पाहण्यासाठी उर्वशी दुबईला पोहोचली ऋषभ पंतच्या या पोस्टवर उर्वशीही गप्प बसली नाही. तिने तिच्या स्टाईलमध्ये एक पोस्ट शेअर करत क्रिकेटरला प्रत्युत्तर दिले. तिने ऋषभ पंतला छोटू भैया म्हटले. मात्र, नंतर उर्वशीने ऋषभ पंतची माफीही मागितली. विशेष म्हणजे, 4 ऑक्टोबर रोजी उर्वशीने ऋषभ पंतचे नाव न घेता त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि फ्लाइंग किस दिल्या होत्या. आताही उर्वशीने पंतला फॉलो करत ऑस्ट्रेलिया गाठले आहे.

टॅग्स :रिषभ पंतउर्वशी रौतेलासूर्यकुमार अशोक यादव
Open in App