Join us  

VIDEO : आशिया कपपूर्वी भारताला मोठा दिलासा; पंत 'फोटोग्राफर' अन् राहुल आणि अय्यर 'मैदानात'

३० ऑगस्टपासून आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 7:54 PM

Open in App

asia cup 2023 : ३० ऑगस्टपासून आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे. या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान २ सप्टेंबर रोजी आमनेसामने असणार आहेत. पाकिस्तान आणि नेपाळने आगामी स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. मात्र, अद्याप बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला नाही. अशातच आशिया चषकाच्यापूर्वी टीम इंडियाला दिलासा मिळाल्याचे दिसते. कारण दीर्घकाळ दुखापतीमुळे संघाबाहेर असलेले लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी आता बॅट उचलली आहे. दोन्ही खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव सामना खेळताना दिसले. भारतीय शिलेदार सराव करत असताना यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने याचा व्हिडीओ काढला आहे. 

राहुल आणि अय्यर मागील अनेक दिवसांपासून नेटमध्ये घाम गाळत होते. पण आता हे दोघे सराव सामन्यातही दिसले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने हा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. मागील वर्षी ३० डिसेंबर रोजी झालेल्या भीषण कार अपघातानंतर पंत देखील आता एनसीएमध्ये आहे. तर, श्रेयस अय्यरला आयपीएलपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेदरम्यान पाठीला दुखापत झाली होती. तसेच आयपीएल २०२३ दरम्यान क्षेत्ररक्षण करताना राहुलच्या पायाला दुखापत झाली होती.

२ सप्टेंबरला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे आशिया चषक खेळवला जाणार आहे. BCCI ने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्यानंतर ACC ने ही स्पर्धा पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाकिस्तानात ४ व श्रीलंकेत ९ सामने होणार आहेत. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होतील. भारतीय वेळेनुसार हे सामने दुपारी १.३० वाजल्यापासून सुरू होतील. पाकिस्तान, भारत आणि नेपाळ अ गटात आहेत, तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तानचा समावेश आहे. 

आशिया चषकाचे वेळापत्रक३० ऑगस्ट - पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान३१ ऑगस्ट - बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान वि. भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत वि. नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल 

टॅग्स :एशिया कप 2022लोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघरिषभ पंतश्रेयस अय्यर
Open in App