Join us

Video: टायगर इज बॅक; ऋषभ पंतच्या प्रकृतीत सुधारणा, कोणाच्याही मदतीशिवाय चढला पायऱ्या

Rishabh Pant Fitness: ऋषभ पंत सधअया बंगळुरुतील NCA मध्ये उपचार घेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 17:39 IST

Open in App

Rishabh Pant Fitness: भारतीय क्रिकेट संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. शेवटच्या दिवशी लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांसारख्या दिग्गजांच्या विकेट पडत होत्या, तेव्हा चाहत्यांच्या मनातून एकच इच्छा बाहेर पडत होती. ती म्हणजे, 'ऋषभ पंत असायला हवा होता...' ऋषभला मैदानावर पुन्हा पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. ऋषभ पंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यातून तो वेगाने बरा होत असल्याचे दिसत आहे. 

टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत पाच महिन्यांपूर्वी एका भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या शरीराला खूप गंभीर इजा झाल्या होत्या. पण, आता तो वेगाने बरा होत आहे. सध्या त्याच्यावर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार सुरू आहेत. पंत त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून वेळोवेळी चाहत्यांना त्याच्या फिटनेसचे अपडेट्स देत असतो. एका व्हिडिओद्वारे ऋषभने ठीक होत असल्याचे संकेत दिले आहेत. 

ऋषभ पंतने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पायऱ्या चढतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो कोणाच्याही आधाराशिवाय पायऱ्या चढतोय. याशिवाय, दुसऱ्या एका व्हिडिओत तो काठीच्या सहाय्याने व्यायाम करताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये ऋषभच्या चेहऱ्यावरील हावभावावरुन स्पष्ट जाणवते की, त्याला खूप वेदना होत आहेत. पण, अशा कठीण परिस्थितीत स्वतःला फिट करण्याचा प्रयत्न करतोय.

टॅग्स :रिषभ पंतअपघातऑफ द फिल्डसोशल मीडिया
Open in App