Rishabh Pant Captain India A Squad Against South Africa A : दुखापतीमुळे टीम इंडिया बाहेर असलेला रिषभ पंत पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रिषभ पंत भारतीय 'अ' संघाकडून कर्णधाराच्या रुपात क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करताना दिसेल. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका 'अ' संघाविरुद्धच्या चारदिवसीय अनाधिकृत कसोटी मालिकेसाठी नुकतीच भारतीय 'अ' संघाची घोषणा केली. या मालिकेत रिषभ पंतकडे भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून युवा बॅटर साई सुदर्शन याच्याकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडलाही दुसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दुखापतीतून सावरून पुन्हा मैदानात उतरतोय पंत
इंग्लंड दौऱ्यातील चौथ्या कसोटी सामन्यात रिषभ पंत पायच्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. या दुखापतीतून सावरून रिषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २ सामन्यांच्या चारदिवसीय कसोटी सामन्यातून पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. हे दोन्ही सामने बंगळुरुस्थित बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत.
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
कधी खेळवण्यात येणार भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' यांच्यातील दोन सामन्यांची मालिका
भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' यांच्यातील पहिला सामना ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार असून दुसरा सामना ६ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येईल. ऋतुराज गायकवाडसह दुसऱ्या सान्यात लोकेश राहुलही मैदानात उतरल्याचे पाहयला मिळेल.
पहिल्या चार दिवसीय कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ :
रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, एन जगदीशन (विकेटकीपर), साई सुदर्शन (उप कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुश कोटियन, मानव सूथार, अंशुल कंबोज, यश ठाकुर, आयुष बडोनी, सारांश जैन.
दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ :
रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), केएल राहुल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन (उप कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुश कोटियन, मानव सूथार, खलील अहमद, गुर्नूर ब्रार, अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप.