Rishabh Pant May Be Miss Asia Cup 2025 : इंग्लंड दौऱ्यावरील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. उजव्या पायाला फॅक्चर असल्यामुळेे रिषभ पंत संघातून आउट झाला आहे. मँचेस्टर कसोटी सामन्यात क्रिस वोक्सच्या चेंडूवर तो दुखापतग्रस्त झाला होता. पंतला किमान ६ आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. त्यामुळे ओव्हल कसोटीच नव्हे तर आशिया कप स्पर्धेलाही त्याला मुकावे लागू शकते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रिषभ पंत या स्पर्धेतून होऊ शकतो आउट, अकोल्याच्या पठ्याला मिळू शकते संधी
९ सप्टेंबर पासून आशियाई कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ १० सप्टेंबरला या स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार आहे. त्याआधी ऑगस्टच्या अखेरपर्यंत BCCI ला कोणत्याही परिस्थितीत संघाची घोषणा करावी लागेल. त्यामुळे रिषभ पंतची आशिया कप स्पर्धेसाठी संघात निवड होणे मुश्किल वाटते. सध्याच्या घडीला त्याच्या जागी अनेक तगडे पर्याय उपलब्ध अकोल्याचा पठ्ठ्या आणि RCB संघाकडून IPL चॅम्पियनचा टॅग लागलेल्या जितेश शर्माची त्याच्या जागी टीम इंडियात वर्णी लागू शकते.
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
RCB ला चॅम्पियन करण्यात उचललाय मोलाचा वाटा
संजू सॅमसनच्या रुपात सलामीवीर आणि विकेट किपर बॅटरच्या रुपात एक पर्याय टीम इंडियाकडे आधीच उपलब्ध आहे. पण दुसऱ्या विकेट किपरच्या रुपात जितेश शर्माला पसंती मिळू शकते. अकोल्याच्या क्रिकेटरनं IPL २०२५ स्पर्धेत RCB च्या संघाला चॅम्पियन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावाली होती. आशिया कप स्पर्धाही टी-२० प्रकारात खेळवली जात असल्यामुळे जितेश शर्माची दावेदारी अधिक भक्कम मानली जात आहे.
ध्रुव जुरेलच्या रुपातही एक पर्याय, पण..
इंग्लंड दौऱ्यावर रिषभ पंत दुखापतग्रस्त झाल्यावर विकेटमागे दिसलेला ध्रुव जुरेलच्या रुपातही एक पर्याय टीम इंडियाकडे असेल. त्यानेही राजस्थान रॉयल्सकडून धमक दाखवलीये. पण रिषभ पंत अपघातामुळे टीम इंडियाबाहेर होता त्यावेळी जितेश शर्मा टी-२० संघासोबत दिसला होता. त्यामुळेच आशिया कप स्पर्धेतून रिषभ पंत बाहेर पडला तर जितेश शर्मा हाच पहिली पसंती ठरेल.