Riley Meredith Split Stump Video : इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या व्हाइटॅलिटी ब्लास्ट टी२० सामन्यात मंगळवारी जे घडले ते सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे होते. IPL मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)कडून खेळलेला वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथ याने सोमरसेट संघाकडून खेळताना वेग आणि ताकदीचे झक्कास मिश्रण दाखवून दिले, जे यापूर्वी क्वचितच कोणी केले असेल. आतापर्यंत क्रिकेट चाहत्यांनी अर्धा स्टंप जमिनीत आणि वरचा अर्धा भाग तुटल्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील, पण मेरेडिथने वेगळ्याच पद्धतीने स्टंप तोडून दाखवला.
रिले मेरेडिथचा 'स्प्लिट विकेट'चा पराक्रम
हा सामना सोमरसेट आणि एसेक्स यांच्यात खेळला जात होता. एसेक्सच्या डावात मेरेडिथने त्याच्या वेगवान चेंडूने सलामीवीर मायकेल पेपरला क्लीन बोल्ड केले. पण हा फक्त एक सामान्य चेंडू नव्हता. चेंडू लागताच स्टंपचे अशा पद्धतीने दोन तुकडे झाले की कोणीतरी करवतीने मध्यभागातून लाकूड कापले आहे. स्टंप पुढच्या बाजूने अख्खा उभा होता तर मागच्या बाजूने तुटून तो तुकडा लांब उडाला. पाहा व्हिडीओ-
क्रिकेटमध्ये स्टंप तुटण्याचे किंवा अर्धवट चिर गेल्याचे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. पण मेरेडिथच्या चेंडूने तो स्टंप दोन भागात विभागला गेला. असा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो. त्यामुळेच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सारेच आश्चर्य व्यक्त करत आहेत.