Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! रविवारी पाऊस आला तरी निकाल लागणार; IND vs PAK सामन्यासाठी मोठा निर्णय

आशिया चषकात सुपर ४ मध्ये रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 14:01 IST

Open in App

कोलंबो : आशिया चषकात सुपर ४ मध्ये रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. या मोठ्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ACC) एक मोठा निर्णय घेतला आहे. पावसाचा व्यत्यय पाहता या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता पाऊस आल्यास हा सामना राखीव दिवशी अर्थात सोमवारी खेळवला जाईल. 

खरं तर याआधी साखळी फेरीत झालेल्या सामन्यात हे दोन्ही संघ भिडले होते. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णित राहिला अन् दोन्हीही संघांना १-१ गुण देण्यात आला. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे १० सप्टेंबरच्या सामन्याबाबत संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. याच कारणामुळे राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे १० सप्टेंबरला सामना थांबल्यास ११ तारखेला तिथूनच सामना सुरू केला जाईल. 

आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा. (राखीव खेळाडू - संजू सॅमसन) 

आशिया चषकासाठी पाकिस्तानी संघ -बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, फखर झमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उस्मान मीर, फहीम अशरफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानएशिया कप 2023श्रीलंकापाऊस
Open in App