Join us

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले

मुंबई इंडियन्सचे इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 15:46 IST

Open in App

IPL 2024, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचे इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. हंगामाच्या सुरूवातीला हार्दिक पांड्याकडे ( Hardik Pandya) नेतृत्वाची जबाबदारी सोपवल्यापासूनच चाहते व संघात अंतर्गत नाराजी पसरली होती. त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला आणि त्यांना गाशा गुंडाळावा लागला. हार्दिक व संघातील सिनीयर खेळाडूंमध्ये वाद सुरू असल्याच्या बातम्याही अधुनमधून येत होत्या. संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर हे वाद आणखी वाढल्याचे वृत्त समोर आले आहे. 

मुंबई इंडियन्स १७ तारखेला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. मुंबईला १३ पैकी ४ सामन्यांत विजय मिळवता आला आहे आणि शेवटचा साखळी सामना जिंकून तळाचे स्थान टाळण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. पण, सराव सत्रातही रोहित व हार्दिक यांच्यातला वाद स्पष्टपणे दिसला. हार्दिक जेव्हा सरावासाठी नेट्समध्ये आला तेव्हा रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांनी नेट्समधून काढता पाय घेतला. दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिक व रोहित यांनी एकत्रित सराव केला नाही. KKR विरुद्धच्या लढतीपूर्वीची ही घटना आहे, जिथे MI ला पराभव पत्करावा लागला. रोहितने नेट्मध्ये पहिला फलंदाजीचा सराव केला आणि तेव्हा हार्दिक जवळपास नव्हता.

पण, जेव्हा हार्दिक फलंदाजीसाठी नेट्समध्ये आला, तेव्हा रोहित, सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांच्यासोबत मैदानाबाहेर गेला. 

 

KKR विरुद्धच्या पराभवानंतर पराभवानंतर हार्दिकने सांगितले होते की, फलंदाजीची बाजू म्हणून आम्ही पाया मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर आम्ही त्याचा फायदा उठवू शकलो नाही आणि गती राखू शकलो नाही. पावसामुळे गोलंदाजांची गती निर्णायक ठरत होती. पण मला वाटले की गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सीमारेषेवरून माघारी येणारा प्रत्येक चेंडू ओला होऊन परतत होता. मग कोणताही न विचार करताना खेळाचा आनंद घेण्याचे ठरवले. अंतिम सामन्याचा आनंद घेण्याचे आमचे लक्ष्य आहे. सुरुवातीपासूनच मी या विचाराचा राहिलो आहे. मला वाटत नाही की, आम्ही यंदाच्या हंगामात चांगले क्रिकेट खेळले आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्यारोहित शर्मासूर्यकुमार अशोक यादव