Join us

...म्हणून क्रिकेटचा हिरा सचिन तेंडुलकरला अजून 'हॉल ऑफ फेम'चं कोंदण नाही!

म्हणून आजपर्यंत सचिनला ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 16:43 IST

Open in App

नवी दिल्ली :  भारताचा माजी क्रिकेटपटू 'द वॉल' राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये दोन दिवसांपूर्वी समावेश करण्यात आला.  हा सन्मान मिळवणारा राहुल द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू आहे. याआधी  बिशन सिंह बेदी, सुनिल गावस्कर, कपिल देव आणि अनिल कुंबळे यांचा समावेश आहे. पण या सन्मानाचा मान अद्याप क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला मिळाला नाही. त्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित राहिले असतील. क्रिकेटचा हिरा समजल्या जाणाऱ्या सचिन सारख्या दिग्गजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये का सामाविष्ट करण्यात आले नाही.  ‘हॉल ऑफ फेम’मध्ये एखाद्या खेळाडूची निवड करण्यासाठी किंवा खेळाडूंचे नामांकन करणाऱ्यामध्ये प्रमुख पत्रकार, पंच, मॅच रेफरी किंवा प्रशासक यांचा सामावेश आहे. ‘हॉल ऑफ फेम’मध्ये सामाविष्ट होण्यासाठी जे नियम आहेत त्यामध्ये सचिन तेंडुलकर फिट बसत नाही. म्हणून आजपर्यंत सचिनला ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही. 

काय आहेत नियम - 

- फलंदाजाने क्रिकेटच्या कोणत्याही एका प्रकारात कमीतकमी 8000 धावा आणि 20 शतके असायला हवीत. किंवा त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त असावी

- गोलंदाज असेल तर क्रिकेटच्या कोणत्याही एका प्रकारात कमीतकमी 200 पेक्षा जास्त विकेट असायला हव्यात. तसेच कसोटीत 50 तर एकदिवसीय सामन्यात 30 ची सरासरी असायला हवी. 

- यष्टिरक्षकांसाठी क्रिकेटच्या कोणत्याही एका प्रकारात 200 पेक्षा जास्त विकेट्स हव्यात. 

- कर्णधाराने जर 25 कसोटीत किंवा 100 वनडेत नेतृत्व करताना किमान एका प्रकारात तरी जिंकण्याची टक्केवारी 50 पेक्षा जास्त हवी.  

- महत्त्वाचे म्हणजे ज्या खेळाडूंचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणार आहे, त्या खेळाडूंनी पाच वर्षांत कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले नसावे. (सचिन तेंडुलकरने नोव्हेंबर 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.)

 

टॅग्स :सचिन तेंडूलकरराहूल द्रविडआयसीसीक्रिकेटक्रीडा