Join us

RCBचा अतिउत्साह, शुबमन गिलला आधीच दिल्या शतकाच्या शुभेच्छा; Delete करावं लागलं ट्वीट, जाणून घ्या का

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत वन डे संघात खेळण्याच्या मिळालेल्या संधीचं शुबमन गिलनं ( Shubman Gill) सोनं केलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 14:35 IST

Open in App

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत वन डे संघात खेळण्याच्या मिळालेल्या संधीचं शुबमन गिलनं ( Shubman Gill) सोनं केलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत गिलने सातत्यपूर्ण कामगिरी केली. तिसऱ्या वन डे सामन्यात तर तो शतकाच्या उंबरठ्यावर आला होता, परंतु पावसाने घोळ घातला. ९८ धावांवर असताना पुन्हा पाऊस आला आणि सामना थांबवावा लागला. त्यामुळे गिलचे वन डे तील पहिले शतक झळकावण्याचे स्वप्न अधुरे राहिले. पण अशातच रॉयल चॅलेंजर्सना अतिउत्साह नडला आणि त्यांना नंतर आपलं ट्वीट डिलीट करावं लागलं.

९८ धावांवर असताना पुन्हा पाऊस आला आणि सामना थांबवावा लागला. त्यामुळे गिलचे वन डे तील पहिले शतक हुकलं. पण याचवेळी रॉयल चॅलेंजर्सनं त्याला पहिलं शतक झळकावल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. परंतु नंतर अतिउत्साहाच्या भरात केलेलं ट्वीट डिलीट करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. प्रथम पाऊस पडण्यापूर्वी गिलने ६५ चेंडूंत ५१ धावा केल्या होत्या, परंतु पावसाच्या बॅटींगनंतर गिलची आतषबाजी सुरू जाली. त्याने १६ चेंडूंत ३१ धावा चोपल्या. ८० धावांचा टप्पा ओलांडल्यावर पुढील १७ चेंडूंत त्याने १६ धावा केल्या. ९८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह गिल ९८ धावांवर नाबाद राहिला.

टॅग्स :शुभमन गिलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरभारतीय क्रिकेट संघ
Open in App