RCB vs DC WPL Final 2026 Smriti Mandhana Record : महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामातील फायनल सामन्यात विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना RCB ची कॅप्टन स्मृती मानधना हिने अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक झळकावले. टी-२० कारकिर्दीतील तिची ही सर्वात जलद अर्धशतकी खेळी ठरली. एवढेच नाही तर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या फायनलमधील वादळी खेळीसह तिने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत अव्वलस्थानावर कब्जा करत ऑरेंज कॅपही पटकावली. याआधी MI ची कर्णधार हरमनप्रीत कौरनं हरमनप्रीत कौरनं यंदाच्या हंगामात ८ सामन्यातील ८ डावात ३ अर्धशतकासह ३४२ धावा केल्या होत्या. विक्रमी धावांचा पाठलाग करताना स्मृतीनं तिला ओव्हरटेक केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्मृतीनं वादळी खेळी अन् विक्रमांची 'बरसात'
स्मृती मानधनानेदिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या फायनल लढतीत ४१ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. यंदाच्या हंगामात तिच्या बॅटमधून आलेली ही तिसरे अर्धशतक ठरले. या खेळीसह तिने यंदाच्या हंगामात ३७७ धावा केल्या आहेत. ९६ ही WPL च्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येची कामगिरीही तिने यंदाच्या हंगामातच केली. याशिवाय फायनलमध्ये सर्वोच्च धावसंख्ये करण्याचा विक्रमही तिने आपल्या नावे केला.
बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर! WPLमध्ये जलवा बिखरणारी ही ग्लॅमर क्वीन कोण?
यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटर
स्मृती मानधना ९ सामन्यातील ९ डावात ३७७ धावाहरमनप्रीत कौर ८ सामन्यातील ८ डावात ३४२ धावानॅट स्किव्हर-ब्रंट ७ सामन्यातील ७ डावात ३२१ धावालिझेल ली १० सामन्यातील १० डावात ३२० धावालॉरा वोल्वार्ड्ट १० सामन्यातील १० डावात ३१७ धावा
WPL फायनलमधील सर्वाधिक वैयक्तिक धावांचा रेकॉर्ड
८७ (४१ चेंडू) – स्मृती मंधाना विरुद्ध DC, वडोदरा, २०२६७९ (५४ चेंडू) – जॉर्जिया व्होल विरुद्ध DC, वडोदरा, २०२६६६ (४४ चेंडू) – हरमनप्रीत कौर विरुद्ध DC, ब्रेबॉर्न, २०२५६० (५५ चेंडू)* – नॅट स्किव्हर-ब्रंट विरुद्ध DC, ब्रेबॉर्न, २०२३५७ (३७ चेंडू) – जेमिमा रॉड्रिग्ज विरुद्ध RCB, वडोदरा, २०२६
Web Summary : Smriti Mandhana's blistering 23-ball fifty in the WPL final propelled RCB. She surpassed Harmanpreet Kaur to seize the Orange Cap, becoming the tournament's highest run-scorer with a dominant batting display against Delhi Capitals.
Web Summary : स्मृति मंधाना ने WPL फाइनल में 23 गेंदों में अर्धशतक बनाकर RCB को बढ़त दिलाई। उन्होंने हरमनप्रीत कौर को पछाड़कर ऑरेंज कैप जीती, और दिल्ली कैपिटल्स के खिलाफ शानदार प्रदर्शन किया।