WPL 2026 Final : स्मृती-जॉर्जियाचा धमाका; विक्रमी विजयासह RCB नं जिंकली दुसरी ट्रॉफी; DC च्या पदरी पुन्हा निराशा

स्मृतीच्या RCB नं विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 23:18 IST2026-02-05T23:15:13+5:302026-02-05T23:18:52+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
RCB vs DC WPL 2026 Final Royal Challengers Bengaluru win 2nd WPL Title vs Delhi Capitals Women Smriti Mandhana Georgia Voll Shine | WPL 2026 Final : स्मृती-जॉर्जियाचा धमाका; विक्रमी विजयासह RCB नं जिंकली दुसरी ट्रॉफी; DC च्या पदरी पुन्हा निराशा

WPL 2026 Final : स्मृती-जॉर्जियाचा धमाका; विक्रमी विजयासह RCB नं जिंकली दुसरी ट्रॉफी; DC च्या पदरी पुन्हा निराशा

WPL 2026 Final Royal Challengers Bengaluru Record Chase To Seal Second Title vs Delhi Capitals : स्मृती मानधना आणि जॉर्जिया वोल यांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर RCB च्या संघाने दुसऱ्यांदा WPL ट्रॉफीवर नाव कोरले. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना जेमिमाच्या अर्धशतकासह अखेरच्या षटकात शिनेल हेन्रीनं केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २०३ धावा केल्या. WPL च्या इतिहासातीलच नव्हे तर IPL च्या फायनलमच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या होती.   २०४ धावांचा यशस्वी पाठलाग करत RCB च्या संघाने नवा इतिहास रचला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाची कॅप्टन्सी बदलानंतरही फायनलमधील पराभवाची मालिका कायम राहिली.  या विजयासह स्मृती मानधना आणि RCB च्या संघाने WPL मध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकणाऱ्या हरमनप्रीत कौर आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची बरोबरी केली आहे. RCB नं २०२४ नंतर जिंकलेली ही दुसरी ट्रॉफी आहे. मुंबई इंडियन्सने WPL मध्ये २०२३ आणि २०२५ मध्ये फायनल जिंकली होती. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या चारही हंगामात DC च्या संघाला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. 

  WPL 2026: रेकॉर्ड ब्रेकर क्वीन! वादळी खेळीसह स्मृतीची कमाल, हरमनला मागे टाकत ऑरेंज कॅपवरही कब्जा

स्मृती- जॉर्जियाची विक्रमी भागीदारी अन्...

जेमिमा रॉड्रिग्जच्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने दिलेल्या २०४ धावांचा पाठलाग करताना अवघ्या ९ धावांवर RCB च्या संघाने आपली पहिली विकेट गमावली होती. ग्रेस हॅरिस माघारी फिरल्यावर स्मृती मानधना आणि जॉर्जिया जोडी जमली. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ चेंडूत १६५ धावांची दमदार भागीदारी करत DC च्या संघाला बॅकफूटवर ढकलले. WPL च्या इतिहासात कोणत्याही  विकेटसाठी ही विक्रमी भागीदारी ठरली. स्मृती मानधना हिने ४१ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. याशिवाय जॉर्जिया वॉल हिने ५४ चेंडूत १४ चौकाराच्या मदतीने ७९ धावा केल्या. या दोघींच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्सच्या संघाने पुन्हा एकदा दिल्लीच्या पहिल्या जेतेपदाच्या स्वप्नाला सुरुंग लावला.

असं पहिल्यांदाच घडलं

WPL च्या इतिहासात पहिल्यांदा फायनलची लढाई २०० पार धावसंख्येची झाली.  आतापर्यंतच्या WPL च्या इतिहासात थेट फायनल गाठणारा संघ कधीच ट्रॉफी जिंकला नव्हता. त्यामुळे यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ जेमिमा रॉड्रिग्जच्या नेतृत्वाखाली फायनलमधील पराभवाची मालिका खंडीत करत ट्रॉफीवर नाव कोरेल, असे वाटत होते. पण RCB नं इतिहास बदलला. एलिमिनेटरमधून फायनल गाठणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करून दाखवला. 

  • २०२३ च्या हंगामात दिल्ली थेट फायनलमध्ये पोहचली. एलिमिनेटरमधील विजेत्या मुंबई इंडियन्सनं ट्रॉफी जिंकली.
  • २०२४ च्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने थेट फायनल गाठली. एलिमिनेटरमधील विजेत्या RCB नं ट्रॉफी जिंकली
  • २०२५  दिल्ली थेट फायनल गाठली. या हंगामात एलिमिनेटरमधील विजेत्या MI ने ट्रॉफी जिंकली.
     

Web Title : RCB ने WPL 2026 फाइनल जीता, रिकॉर्ड चेस; डीसी फिसड्डी।

Web Summary : स्मृति और जॉर्जिया की विस्फोटक साझेदारी ने डीसी के खिलाफ आरसीबी को ऐतिहासिक डब्ल्यूपीएल जीत दिलाई। आरसीबी ने 204 रनों का रिकॉर्ड चेस किया, अपना दूसरा खिताब जीता, जबकि डीसी को एक और फाइनल में हार का सामना करना पड़ा।

Web Title : RCB wins WPL 2026 final with record-breaking chase; DC falters.

Web Summary : Smriti and Georgia's explosive partnership powered RCB to a historic WPL victory against Delhi Capitals. RCB chased down a record 204 runs, securing their second title, while DC faced another final defeat, continuing their trophy drought.