भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तो भारतीय संघासोबत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी (World Test Championship Final) सज्ज झाला आहे. चार महिन्यांच्या या दौऱ्यावर खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबीयांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर भारताकडून सरावाला सुरूवात करणारा पहिला खेळाडू हा जडेजाच होता आणि त्यानं गोलंदाजीचा सराव केला. याच दरम्यान त्यानं मुलगी निध्यानाचा चौथा वाढदिवसही साजरा केला. लेकीच्या वाढदिवसाला रवींद्र जडेजा व त्याची पत्नी रिवाबा (Rivaba Jadeja) यांनी एक कौतुकास्पद कार्यही केलं. या दोघांनी आर्थिकदृष्ट्य दुर्बल असलेल्या पाच कुटुंबीयांच्या खात्यात रक्कम जमा केली. बाबो! 13 षटकार, 7 चौकार, 28 चेंडूंत झळकावलं शतक; टी 10 सामन्यात उभा केला धावांचा एव्हरेस्ट
जडेजाची पत्नी रिवाबानं पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले आणि त्यानंतर या सर्व बचत खात्यांमध्ये प्रत्येकी 10 हजार रुपये जमा केले. गरीब कुटुंबातील मुलींच्या नावानं हे बचत खाते उघडण्यात आले आहेत. रवींद्र जडेजासह रिवाबाही इंग्लंडला गेली आहे. अशात पासबूक वाटपाच्या कार्यक्रमात ही दोघं व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून सहभागी झाली होती. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र व रिवाबा या दोघांनी 10 हजार गरीब मुलींना मदत करण्याचा निर्धार केला आहे आणि त्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. IPL 2021ला वाचवण्यासाठी BCCI नं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा दिलाय बळी?; एका निर्णयानं वाढवली आयसीसीची डोकेदुखी
रिवाबानं नेत्रदान करण्याचा घेतलाय निर्णय
रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबानं तिच्या वाढदिवसानिमित्तानं नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. जडेजा व रिवाबा यांनी 2016मध्ये लग्न केलं. शाही अंदाजात झालेल्या या लग्नाला मोठमोठ्या व्यक्ती उपस्थित होत्या. रिवाबाचे कुटंबीय काँग्रेस पक्षाशी निडगीत आहेत आणि 2019मध्ये रिवाबानं भाजपात प्रवेश केला.
रवींद्र जडेजाचे हॉटेल सांभाळण्याचं काम पाहते रिवाबारिवाबानं राजकोट येथील आत्मिया इंस्टीस्ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून मॅकेनिकल इंजिनियरींग केली आहे. ती रवींद्र जडेजाची बहीण नैनाची मैत्रीण आहे. बहिणीमुळेच या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर प्रेम व लग्न... रिवाबा लग्नानंतर यूपीएससीची तयारी करत होती, परंतु तिनं नंतर अभ्यास सोडला. आता ती रवींद्र जडेजाचा जड्डूस फूड फिल्ड हे रेस्टाँरंट सांभाळते.