Join us  

Asia Cup: रवी शास्त्रींनी निवडला भारताचा संघ, दोन तगड्या मॅचविनर्सना ठेवलं संघाबाहेर

३० ऑगस्टपासून सुरू होणार आशिया चषक स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:46 PM

Open in App

Team India Squad for Asia Cup 2023 by Ravi Shastri: भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांच्या पसंतीच्या खेळाडूंची निवड करून आशिया कप 2023 साठी भारताच्या 15 सदस्यीय संघ निवडला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रवी शास्त्री यांनी आशिया चषक 2023 संघातून भारताच्या दोन सर्वात मोठ्या मॅचविनर्सना वगळले आहे. आशिया कप 2023 पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार असून, ही स्पर्धा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार असून एकूण 13 सामने खेळवले जातील.

रवी शास्त्रींच्या संघातून दोन मॅचविनर्सना वगळलं...

रवी शास्त्री यांनी शुभमन गिल, इशान किशन आणि रोहित शर्मा यांची एशिया कप 2023 संघात वरच्या फळीत निवड केली आहे. विराट कोहली, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना मधल्या फळीतील जबाबदारी देण्यात आली आहे. तर यष्टीरक्षकाच्या भूमिकेसाठी इशान किशनची निवड केली आहे. टीम इंडियाच्या अष्टपैलू कामगिरीची जबाबदारी रवी शास्त्रींनी हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांच्या खांद्यावर दिली आहे. गोलंदाजीसाठी युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत ब्रुमराह अशा पाच स्टार्सची निवड केली आहे.

रवी शास्त्री यांनी केएल राहुल आणि श्रेयस अय्यरसारख्या मॅचविनर्सना मात्र संघात स्थान दिलेले नाही. बुमराह सोबतच फिटनेसच्या बाबतीत हे दोघेही चांगली कामगिरी करत होते असा सांगण्यात आले आहे. पण त्यांच्याबद्दल फारशी चर्चा नसल्याने रवी शास्त्री यांनी त्या दोघांना बाहेर बसवणेच योग्य समजल्याचे दिसते आहे.  

आशिया कपसाठी रवी शास्त्रींनी निवडलेली टीम इंडिया- शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत ब्रुमराह.

दरम्यान, आशिया कपमध्ये भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळचा संघ सहभागी होणार आहे. आतापर्यंत 15 वेळा रंगलेल्या या स्पर्धेत भारताने सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. भारतानंतर सर्वाधिक वेळा आशिया चषक जिंकण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेने ६ वेळा जेतेपदावर कब्जा केला आहे. या वर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या एकदिवसीय विश्वचषकामुळे, आशिया चषक 2023 देखील एकदिवसीय स्वरूपात खेळवला जाणार आहे.

टॅग्स :एशिया कप 2022रवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघलोकेश राहुलश्रेयस अय्यर
Open in App