Join us

युवराज अन् MS Dhoni यांच्या निवृत्तीनंतर झालेली पोकळी 'हा' खेळाडू भरून काढेल; R Ashwinचा मोठा दावा 

Asia Cup 2023 : आर अश्विनला या संघातून वगळ्याने बरीच चर्चा झाली होती आणि त्याय अश्विनने एक मोठं विधान केलं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 13:53 IST

Open in App

Asia Cup 2023 : आशिया कप २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरू होत आहे. टीम इंडियाचा पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियासाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात १ राखीव खेळाडूही आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचे पुनरागमन होत आहे. आर अश्विनला या संघातून वगळ्याने बरीच चर्चा झाली होती आणि त्याय अश्विनने एक मोठं विधान केलं आहे. 

आशिया चषकावर Corona चं संकट? श्रीलंकेच्या दोन प्रमुख खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बराच काळ बाहेर होते आणि असे असतानाही या दोघांना संघात स्थान देण्यात आले. तेही अशा परिस्थितीत जेव्हा राहुल अजून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. निवड समिती प्रमुख अजित आगरकरने अलीकडेच पत्रकारांना सांगितले की, राहुल सध्या किरकोळ दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे आशिया चषकाचा सलामीचा सामना खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे. 

अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आगामी आशिया चषकात भारतासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या केएल राहुलबाबत वादाला वाव नसावा, असे आर अश्विनचे​मत आहे. तो म्हणाला, “राहुल पाचव्या क्रमांकावर येणे निश्चित आहे. युवराज आणि धोनी यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ पाचव्या क्रमांकासाठी पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि राहुलने ती जागाही भरून काढली आहे.  तो तंदुरुस्त असेल तर तो हे करू शकतो. जर तो तयार असेल तर त्याला ५ क्रमांक मिळावा.” 

“या संघासाठी राहुलइतकाच श्रेयस अय्यर महत्त्वाचा आहे. तो फिरकीविरुद्ध फटकेबाजी करणाऱ्या भारतीय संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे आणि भारतासाठी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. तो खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर भारताकडून चौथ्या क्रमांकावर कोण खेळेल यावर वादच नसावा,''असे अश्विनने स्पष्ट केले. 

श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाची मधली फळी मजबूत होईल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे  मालिकेत टीम इंडियाला मधल्या फळीत फलंदाजीची चिंता सतावत असल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान संघाने अनेक खेळाडूंना खेळायला दिले, परंतु कोणीही आपली जागा कायम करू शकले नाही. अशा स्थितीत आता हे दोन्ही खेळाडू संघात परतले, तर संघाला बळ मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :एशिया कप 2023लोकेश राहुलश्रेयस अय्यर
Open in App