Join us

"ती माझी लग्नाची बायको; आम्ही...." क्रिकेटरनं सांगितली व्हायरल फोटोमागची खरी गोष्ट

राशीदसोबत दिसलेली ती महिला कोण? सोशल मीडियावर उलट रंगली उलट सुलट चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:39 IST

Open in App

अफगाणिस्तानचा हुकमी एक्का आणि राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार रशीद खान याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नेदरलँड्समधील आपल्या चॅरिटी फाउंडेशनच्या उद्घाटनावेळी क्रिकेटर एका महिलेसोबत दिसला अन् त्याच्यासोबत दिसलेली ती कोण? अशी चर्चा रंगू लागली. अफगाणिस्तान क्रिकेटरनं आपल्या अधिकृत अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर करत व्हायरल फोटोवरुन निर्माण झालेला संभ्रम दूर केला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!राशीदसोबत दिसलेली ती महिला कोण? सोशल मीडियावर उलट रंगली उलट सुलट चर्चा

नेदरलँड्समधील खान चॅरिटी फाउंडेशनच्या उद्घाटन समारंभातील कार्यक्रमात राशीद खानसोबत अफगाणी पारंपारिक   पोषाखात  एक महिलाही सहभागी झाली होती. क्रिकेटरचे तिच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. राशीद खान याने दुसरं लग्नं केलं की काय? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. यावर अखेर राशीद खानला स्पष्टीकरण दिले आहे.

मग, क्रिकेटरनं शेअर केली आपल्या बेगमसाठी खास स्टोरी 

राशीद खान याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लिहिलंय की, २ ऑगस्ट २०२५ रोजी मी आयुष्यातील एका नव्या आणि अर्थपूर्ण प्रवासाची सुरुवात केली. माझा निकाह झाला आणि मी अशा महिलेशी विवाह केला जी प्रेम, शांतता आणि सहजीवनाचं खरं प्रतिबिंब आहे. अपेक्षेनुसार आयुष्याची जोडीदारीन मिळाली. नुकताच मी माझ्या पत्नीला एका चॅरिटी कार्यक्रमाला नेलं होतं आणि या साध्या गोष्टीवरून लोकांनी अंदाज वेगवेळे अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली. त्या फोटोमागचं सत्य हे की, माझ्यासोबत दिसली ती माझी पत्नी आहे. या फोटोत लपवण्यासारखं काहीही नाही. आम्ही एकत्र उभे आहोत, असे सांगत त्याने व्हायरल फोटोमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर केला आहे.

पत्नीचा फोटो न शेअर केल्याने संभ्रम निर्माण झाला

व्हायरल फोटोमध्येच राशीद खानच्या पत्नीची पहिली झलक पाहायला मिळाली. कार्यक्रमात आपण पत्नीसोबत सहभागी झाल्याचे सांगतानाही क्रिकेटरनं आपल्या पत्नीचा फोटो शेअर केलेला नाही. त्याने लग्नासह कोणत्याही अन्य कार्यक्रमातील पत्नीसोबतचे फोटो शेअर न केल्यामुळेच हे संभ्रमाचे वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rashid Khan clarifies viral photo: 'She is my wife'.

Web Summary : Rashid Khan addressed rumors sparked by a photo with a woman at his charity event. He confirmed she is his wife, whom he married on August 2, 2025. He stated that the speculation arose because he hadn't previously shared photos of her.
टॅग्स :ऑफ द फिल्डअफगाणिस्तानसोशल मीडिया