विदर्भ क्रिकेट असोसिएशनने भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरची फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०२५-२६ च्या देशांतर्गत हंगामात वसीम जाफर विदर्भातील खेळाडूंना फलंदाजीचे धडे शिकवणार आहे. जाफरच्या व्यतिरिक्त मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज विशाल महाडिक यांची विदर्भ अंडर-१९ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. विदर्भ हा गत रणजी ट्रॉफी चॅम्पियन आहे.
जाफरचे विदर्भाशी पूर्वीपासूनच चांगले संबंध राहिले आहेत. कारकिर्दीच्या अखेरीस त्याने नागपूरच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने २०१७-१८ मध्ये रणजी ट्रॉफीत आणि त्यानंतर २०१८-१९ मध्ये इराणी चषक स्पर्धेत नागपुरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. विदर्भ क्रिकेट असोसिएशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, वसीम जाफर हे विर्दभातील अंडर-१४ संघापासून ते वरिष्ठ संघापर्यंत सर्व वयोगटातील खेळाडूंचे फलंदाजी सल्लागार असतील. जाफरने पंजाब, उत्तराखंड आणि ओरिसा येथे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले. जाफर यांननी २०१९-२०२१ पर्यंत पंजाब किंग्जचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.
वसीम जाफरची कारकीर्दजाफरने ३१ कसोटी सामन्यांमध्ये ३४.१० च्या सरासरीने १ हजार ९४४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये पाच शतके समावेश आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी दमदार ठरली. त्याने २६० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५७ शतकांसह १९ हजार ४१० धावा केल्या आहेत. त्याने २००८-०९ आणि २००९-१० मध्ये मुंबईला दोन रणजी ट्रॉफी जेतेपद मिळवून दिले.