Join us

भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

शतकासह मोठा विक्रम थोडक्यात हुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:37 IST

Open in App

 Vaibhav Suryavanshi's Explosive Reply After India A call up But Miss Big Record :  भारताचा युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी हा सातत्याने क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीमुळे चर्चेत आहे.  कतारच्या दोहा येथे पार पडणाऱ्या आशिया कप रायझिंग स्टार्स टी-२० स्पर्धेसाठी बीसीसीआयने नुकतीच या युवा क्रिकेटपटूची भारतीय संघात निवड केली आहे. भारतीय 'अ' संघातील निवडीनंतर १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने रणजी सामन्यात धमाकेदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भारतीय संघात निवड होताच वैभवचा रणजी सामन्यात धमाका! 

रणजी करंडक स्पर्धेत वैभव सूर्यंवशी हा बिहारच्या संघाकडून मैदानात उतरला आहे. मेघालय विरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या आक्रमक अंदाजात फटकेबाजी करत ६७ चेंडूत ९३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार मारले. युवा स्फोटक बॅटरचं शतक अवघ्या ७ धावांनी हुकले. मेघालय संघातील फिरकीपटू बिजोन डे याने त्याला पायचित केले. आगामी युवा आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय 'अ ' संघात निवड झाल्यानंतर त्याने आपल्या सिग्नेचर स्टाईलमध्ये अगदी धमाकेदार अंदाजात याच सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.

India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!

शतकासह मोठा विक्रम थोडक्यात हुकला

वैभव सूर्यवंशी याच्याकडे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिल्या शतकासह खास विक्रमाला गवसणी घालण्याची संधी होती.  ७ धावांसह प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात युवा शतकवीर होण्याचा विक्रमी डाव त्याला साधता आला असता. सध्याच्या घडीला  हा विक्रम ध्रुव पांडोव्ह यांच्या नावावर आहे. या भारतीय क्रिकेटपटूनं १९८८-८९ च्या रणजी हंगामात पंजाबकडून खेळताना वयाच्या अवघ्या १५ वर्षे २३९ दिवसांवर शतक झळकावलं होतं.

बिहारकडून वैभव टॉपर

पटना येथील मॉईन-उल-हक स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी अजॉय दुहा (१२९) आणि स्वस्तिक (९४) यांच्या दमदार खेळीच्या जारोवर मेघालय संघाने ७ बाद  ४०८ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला होता. अनिर्णित राहिलेल्या या सामन्यात बिहारच्या संघाने पहिल्या डावात ४ विकेट्सच्या मोबदल्यात १५६ धावा केल्या. बिहारकडून वैभव सूर्यवंशी याने केलेली धावसंख्याच सर्वोच्च ठरली.

छोट्या फॉरमॅटमधील मोठ्या स्पर्धेत धमाका करण्यासाठी वैभव सज्ज

आयपीएलमध्ये संघात एन्ट्री मारण्यापासून ते अगदी वादळी शतकापर्यंत विक्रमावर विक्रम करणाऱ्या वैभव सूर्यवंशी याने रणजीत धमक दाखवण्याआधी भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलियच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या कसोटीत शतक झळकावले होते. वनडे असो वा कसोटी वैभव सूर्यवंशी हा स्फोटक अंदाजात फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. कतारमधील दोहा येथे रंगणाऱ्या छोच्या फॉरमॅटमधील मोठ्या स्पर्धेत तो असाच धमाका करेल, अशी अपेक्षा आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhav Suryavanshi Shines in Ranji After India Call-Up, Century Missed

Web Summary : Following his India 'A' selection, Vaibhav Suryavanshi blasted 93 off 67 balls in a Ranji match against Meghalaya. The young batter narrowly missed a record as the youngest first-class centurion. He aims to replicate this form in the upcoming Asia Cup.
टॅग्स :वैभव सूर्यवंशीरणजी करंडकभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयएशिया कप