Rajasthan Royals vs Chennai Super Kings, 3rd Match : गुवाहाटीच्या बरसापाराच्या मैदानातून राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा संघ यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरुवात करत आहे. पहिल्यांदाच नियमित कर्णधारपदाच्या रुपात मैदानात उतरलेल्या रियान पराग याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाऊस पडल्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वपूर्ण मानला जात असताना पहिला डाव रियान परागने जिंकला. आता ऋतुराज गायकवाडच्या चेन्नई सुपर किंग्सचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करत तगडे टार्गेट सेट करुन पलटवार करत विजयी सलामी देण्याचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन
संजू सॅमसन (यष्टीरक्षक फलंदाज), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, मॅथ्यू शॉर्ट, शिवम दुबे, कार्तिक शर्मा , जेमी ओव्हरटन, नूर अहमद, मॅट हेन्री, अंशुल कंबोज, खलील अहमद. चेन्नई सुपर किंग्ज इम्पॅक्ट प्लेय: सरफराज खान, प्रशांत वीर, राहुल चहर, गुरजपनीत सिंग, रामकृष्ण घोष
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, ब्रिजेश शर्मा. राजस्थान रॉयल्स इम्पॅक्ट प्लेयर: डोनोवन फरेरा, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रवी सिंग, सुशांत मिश्रा, तुषार देशपांडे