भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक आणि दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविड याने रोहित शर्मासाठी खास मेसेज शेअर केलाय. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एका स्टँडला नुकतेच रोहित शर्माचे नाव देण्यात आले. हिटमॅन रोहितनं मुंबई इंडियन्समधील सहकाऱ्यांसह आपल्या कुटुंबियांतील सदस्यांसोबत या खास प्रसंगी वानखेडेच्या मैदानात हजेरी लावली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या खास सन्मानामुळे रोहित शर्मा आता सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गजांच्या पक्तींत जाऊन बसलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्मासाठी राहुल द्रविडचा खास मेसेज
भारतातील क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नावाचे स्टँड झाल्यावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दरम्यान मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून राहुल द्रविड याने रोहितला दिलेल्या शुभेच्छांचा खास मेसेज शेअर केलाय. ज्यात टीम इंडियाचा माजी कोच खास शैलीत हिटमॅनला शुभेच्छा दिल्याचे देताना पाहायला मिळते.
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
पुन्हा दिसून आले दोघांच्यातील खास बॉन्डिंग
राहुल द्रविड हा यंदाच्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकाच्या रुपात दिसतोय. २०२४ मध्ये राहुल द्रविड आणि रोहित शर्मा जोडीनं भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप जिंकून दिला होता. या दोघांच्यात एक कमालीचे बॉन्डिंग पाहायला मिळाले आहे. तिच गोष्ट आता नव्या व्हिडिओमध्येही दिसून येते.
नेमकं काय म्हणाला राहुल द्रविड?
मुंबई इंडियन्सनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल द्रविड म्हणतोय की, "हाय रोहित, मला वाटतं तू या स्टँडमध्ये खूप षटकार मारले असशील. त्यामुळेच या स्टँडला तुझं नाव देण्यात आलाय. जगातील सर्वोत्तम मैदानात तू चांगली कामगिरी करण्याच्या इराद्यानेच उतरला असशील. ते तू साध्यही केलेस. तू हे स्वप्न कधीच पाहिले नसशील की, या स्टेडियममधील स्टँडला तुझे नाव दिले जाईल. पण आता ते तुझ्या नावाने आहे. त्यासाठी तू पात्रही आहेस. यासाठी तुझे खूप खूप अभिनंदन. या स्टँडमध्ये तू आणखी काही षटकार मारशील, अशी अपेक्षा आहे. ज्यावेळी मला तिकीट मिळणार नाही त्यावेळी कुणाशी संपर्क साधायचा ते मला माहितीये, असे म्हणत द्रविडनं रोहितला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.