Rahul Dravid: भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार का? राहुल द्रविडने दिले असे उत्तर

Rahul Dravid: भविष्यात संधी मिळाल्यास कोचिंगची जबाबदारी पूर्णवेळ पेलण्यास सज्ज आहात काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 06:10 IST2021-07-31T06:10:28+5:302021-07-31T06:10:38+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Rahul Dravid: Will he be the coach of the Indian team? The answer given by Rahul Dravid | Rahul Dravid: भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार का? राहुल द्रविडने दिले असे उत्तर

Rahul Dravid: भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार का? राहुल द्रविडने दिले असे उत्तर

कोलंबो : श्रीलंकेत मर्यादित षटकांच्या मालिकेत भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणारे राहुल द्रविड यांनी, ‘राष्ट्रीय संघाचा पूर्णवेळ कोच बनण्याचा अद्याप विचार केलेला नाही,’ असे शुक्रवारी सांगितले. ‘मी लंकेत अनुभवाचा आनंद लुटला.’ असे माजी कर्णधार आणि महान फलंदाज द्रविड यांनी म्हटले आहे.

तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोताना द्रविड पुढे म्हणाले, ‘पुढच्या भविष्याचा विचार केलेला नाही. भविष्यात संधी मिळाल्यास कोचिंगची जबाबदारी पूर्णवेळ पेलण्यास सज्ज आहात काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला या खेळाडूंसोबत काम करायला आवडते. अन्य कुठलीही बाब डोक्यात येत नाही. पूर्णकालीन भूमिका बजावताना अनेक आव्हाने येतात, त्यामुळे मी वास्तवात शिरू इच्छित नाही.

सध्याचे कोच रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकासह अर्थात १४ नोव्हेंबरनंतर संपणार आहे. ते सध्या ५० वर्षांचे असल्याने पुन्हा अर्ज भरतील का, हे नक्की नाही. कोचपदासाठी वयोमर्यादा ६० पर्यंत आहे. युवा संघ येथे पराभूत झाला. त्यांच्या कामगिरीवर नाराज आहात का, या प्रश्नाच्या उत्तरात द्रविड म्हणाले, ‘नाही. सर्व युवा खेळाडू अनुभवातून शिकतील. श्रीलंका संघाने दमदार गोलंदाजी केली. अशा खेळपट्ट्यांवर धावा काढण्याचे आणि बळी 
घेण्याचे तंत्र आमच्या युवा खेळाडूंना शिकावे लागेल.’

Web Title: Rahul Dravid: Will he be the coach of the Indian team? The answer given by Rahul Dravid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.