'दी वॉल' राहुल द्रविड भारत A आणि 19 वर्षांखालील संघांचे प्रशिक्षकपद सोडणार

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड भारत A आणि 19 वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 09:48 AM2019-08-29T09:48:22+5:302019-08-29T09:49:18+5:30

whatsapp join usJoin us
Rahul Dravid set to be replaced as India A and U-19 head coach after taking over at NCA | 'दी वॉल' राहुल द्रविड भारत A आणि 19 वर्षांखालील संघांचे प्रशिक्षकपद सोडणार

'दी वॉल' राहुल द्रविड भारत A आणि 19 वर्षांखालील संघांचे प्रशिक्षकपद सोडणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड भारत A आणि 19 वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार आहे. सितांशू कोटक आणि पारस म्हाम्ब्रे यांच्याकडे अनुक्रमे भारत A आणि 19 वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षकपद जाणाच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. द्रविडची नुकतीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रुमखपदी निवड झाली आहे आणि तेथे तो उदयोन्मुख खेळाडूंसह सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंबरोबर काम करणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार कोटक आणि म्हाम्ब्रे यांच्याकडे कनिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद काही महिन्यांसाठीच असणार आहे. भारत A संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची नुकतीच निवड झाली आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामध्ये पृथ्वी शॉ, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचे नाव प्रामुख्यानं घ्यावे लागेल.

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारत A आणि 19 वर्षांखालील संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली. शॉच्या नेतृत्वाखाली भारताने 2018चा 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला. या विश्वविजेत्या संघाला द्रविडने मार्गदर्शन केले होते. या स्पर्धेतून भारताला शॉ, गिल, शिवम मावी, मनोज कार्ला, कमलेश नागरकोटी आदी उदयोन्मुख खेळाडू दिले. पण, द्रविड आता राष्ट्रीय अकादमीत भारतीय क्रिकेटच्या विकासासाठी काम करणार आहे. कोटक भारत A आणि 19 वर्षांखालील संघाचे फलंदाजी प्रशिक्षकपदही भूषवतील. त्याने 130 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 41.76च्या सरासरीनं 8061 धावा केल्या आहेत. माजी गोलंदाज म्हाम्ब्रेने दोन कसोटी सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. 

राहुल द्रविड हाजिर हो... हितसंबंध जपण्याच्या मुद्यावरून बीसीसीआयचे फर्मान 
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) शिस्तपालन अधिकाऱ्याने हितसंबंध जपण्याचा आरोप लावत 'जंटलमन' द्रविडला नोटीस पाठवली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी द्रविडला बीसीसीआयच्या शिस्तपालन अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे फर्मान सोडले आहेत. 26 सप्टेंबरला द्रविडला हितसंबंध जपण्याच्या मुद्यावर आपली बाजू मांडावी लागणार आहे.

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांच्या तक्रारीनंतर बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी.के.जैन यांनी ही नोटीस पाठवली. गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनुसार द्रविड हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे आणि शिवाय तो इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष आहे आणि इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्यांचा चेन्नई सुपर किंग्स संघ खेळत आहे. गुप्ता यांनीच सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीतील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेंडुलकर आणि लक्ष्मण हे दोघेही अनुक्रमे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे मेंटॉर आहेत.  
 
 

Web Title: Rahul Dravid set to be replaced as India A and U-19 head coach after taking over at NCA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.