Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा स्फोटक फलंदाज रहमनुल्लाह गुरबाजसोबत गुरुवारी (22 जानेवारी) रात्री क्रिकेट मैदानावर धक्कादायक घटना घडली. वेस्टइंडीजविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात फलंदाजीदरम्यान फील्डरचा जोरदार थ्रो थेट गुरबाजच्या मानेवर लागला, ज्यामुळे तो वेदनेने मैदानावरच कोसळला.
15व्या षटकात घडली घटना
ही घटना अफगाणिस्तानच्या डावातील 15व्या षटकात घडली. गुरबाज नॉन-स्ट्रायकर एंडवर होता. धाव पूर्ण करून तो पुन्हा क्रीजकडे परतत असताना वेस्टइंडीजच्या खेळाडूने टाकलेला थ्रो थेट त्याच्या मानेवर आदळला. चेंडू लागताच गुरबाज खाली कोसळला. अंपायरांनी तत्काळ अफगाणिस्तानच्या फिजिओला मैदानात बोलावले. काही काळ सामना थांबवण्यात आला होता.
मोठी दुखापत टळली; गुरबाजने खेळ सुरू ठेवला
थ्रो इतका जोरात होता की, गुरबाजच्या डोक्यावरचे हेलमेट उडून पडले. पण, सुदैवाने गुरबाजला गंभीर दुखापत झाली नाही. प्राथमिक उपचारानंतर तो पुन्हा उभा राहिला आणि खेळ सुरू ठेवला. दुखापतीनंतरही त्याने जबरदस्त धैर्य दाखवत 58 चेंडूत 71 धावांची खेळी केली. गुरबाज आणि इब्राहिम जादरान यांनी मिळून अफगाणिस्तानला 72 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र, त्यानंतर अफगाणिस्तानची मधली फळी पूर्णपणे अपयशी ठरला.
मिडल ऑर्डर अपयशी; अफगाणिस्तानचा पराभव
अफगाणिस्तानच्या मिडल ऑर्डरमधील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी, 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ केवळ 136 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि सामना गमावला.
टी20 वर्ल्ड कपआधी गुरबाजच्या फिटनेसची चिंता
अफगाणिस्तानने हा सामना गमावला असला तरी, सर्वाधिक चिंता गुरबाजच्या फिटनेसबाबत व्यक्त केली जात आहे. पुढील महिन्यात टी20 वर्ल्ड कप सुरू होत असून, गुरबाज पूर्णपणे फिट न झाल्यास अफगाणिस्तानसाठी तो मोठा धक्का ठरू शकतो.
अफगाणिस्तानने मालिका जिंकली
तिसरा सामना गमावला असला तरी, अफगाणिस्तानने आधीच पहिल्या दोन सामने जिंकत टी20 मालिका आपल्या नावावर केली आहे. या मालिकेत अफगाणिस्तानकडून दारविश रसूली याने सर्वाधिक 156 धावा, तर इब्राहिम जादरानने 137 धावा केल्या.
Web Summary : Afghanistan's Rahmanullah Gurbaz was hit on the neck by a throw during a T20 match against West Indies. He collapsed but recovered, bravely scoring 71 runs. Despite his efforts, Afghanistan lost. Concerns rise about his fitness before the T20 World Cup.
Web Summary : वेस्टइंडीज के खिलाफ टी20 मैच में अफगानिस्तान के रहमनुल्लाह गुरबाज के गर्दन पर गेंद लगी। वह गिर गए, लेकिन ठीक होकर 71 रन बनाए। इसके बावजूद अफगानिस्तान हार गया। टी20 विश्व कप से पहले उनकी फिटनेस को लेकर चिंता बढ़ गई है।