Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs PAK : हायहोल्टेज सामन्याआधी ड्रामा! अश्विन म्हणतो; पाकिस्तान लवकरच यू टर्न घेईल अन्...

पाकिस्तान आपला निर्णय बदलणार? भारताचा माजी क्रिकेटर नेमकं काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:35 IST

Open in App

IND vs PAK: टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतून बाहेर पडण्याची पोकळ धमकी दिल्यावर पाकिस्तान संघाने नवी नौटंकी सुरु केली आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची अधिकृत पुष्टी करताना भारतीय संघाविरुद्धच्या साखळी फेरीतील लढतीवर बहिष्कार टाकणार असल्याची नवी चाल पाकिस्तानने खेळली आहे. पाकिस्तान सरकारने यासंदर्भातील घोषणा केली. पण अद्यापही PBC च्या संघाकडून ICC ला यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आर. अश्विनचं मोठं वक्तव्य, पाकिस्तान यू टर्न घेणार अन्...

दरम्यान आता भारताचा माजी फिरकीपटून आर. अश्विन याने पाकिस्तान इथंही कोलांटी उडी मारेल, असा दावा केला आहे. IND vs PAK यांच्यातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यासंदर्भात त्याने मोठं वक्तव्य केले आहे. पाकिस्तान लवकरच यू टर्न घेईल आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना ठरल्याप्रमाणे खेळवला जाईल, असे भारतीय फिरकीपटूने म्हटले आहे. 

"मोदींनी ठरवलं तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उद्ध्वस्त होईल"; पाकिस्तानी क्रिकेटरचा Video Viral

पाकिस्तान आपला निर्णय बदलणार? भारताचा माजी क्रिकेटर नेमकं काय म्हणाला?  आपल्या यू ट्यूब चॅनेलवरील खास शोमध्ये आर. अश्विन म्हणाला आहे की, " भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना १०० टक्के होईल. मला वाटतं की, पुढच्या चार-पाच दिवसांत पाकिस्तान आपला निर्णय बदलले. जर हा सामना झाला नाही तर मोठे आर्थिक नुकसान होईल. ब्रॉडकास्टर्सला मोठा फटका बसेल. याचा परिणाम ICC च्या अन्य सदस्य संघांवर देखील होईल. ICC च्या बैठकीत सर्व सदस्य देश पाकिस्तानमुळे हे सर्व होत आहे, अशी भूमिकाही मांडतील."  

पाकिस्तानमधील टी-२० लीगवरही होईल मोठा परिणाम

आर. अश्विन याने असंही म्हटलं आहे की, पाकिस्तानच्या संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्धच्या सामन्यात बहिष्काराची भूमिका कायम ठेवली, तर त्यांना आर्थिक नुकसान तर होईलच. पण याशिवाय PSL स्पर्धाही धोक्यात येईल. ICC परदेशी खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची परवानगी नाकारू शकते. 

बहाणेबाजी चालणार नाही, कारण...

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना हा हायब्रीड मॉडलनुसार नियोजित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसह भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मिळून याला मंजूरी दिली आहे. त्यामुळे सामन्याच्या ठिकाणावरुन वाद निर्माण होण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाविरुद्ध खेळण्यास नकार देण्यासारखे कोणतेही ठोस कारण पाकिस्तानकडे नाही. त्यामुळे आशा आहे की, समजूतदारपणा दाखवत पाकिस्तान हा सामना खेळण्यासाठी तयार होईल, असेही अश्विनने म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs PAK Drama: Ashwin predicts Pakistan U-turn on World Cup match.

Web Summary : Amidst threats of boycotting the India match, Ashwin predicts Pakistan will ultimately play in the T20 World Cup. He cites potential financial losses and ICC pressure if they withdraw, impacting even the PSL.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध पाकिस्तानआर अश्विनभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआयसीसी