SMAT 2025: ४ चौकार अन् ३ उत्तुंग षटकार! ३७७ च्या स्ट्राइक रेटसह अभिषेकचा मोठा धमाका

पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप ठरला, पण मोक्याच्या क्षणी फार्मात आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:39 IST2025-12-04T18:37:22+5:302025-12-04T18:39:01+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Quick Fire Innings For Punjab Captain Abhishek Sharma 34 Runs In Just 9 Balls 4 Fours And 3 Sixes With Stike Rate 377-78 Against Puducherry In SMAT 2025 | SMAT 2025: ४ चौकार अन् ३ उत्तुंग षटकार! ३७७ च्या स्ट्राइक रेटसह अभिषेकचा मोठा धमाका

SMAT 2025: ४ चौकार अन् ३ उत्तुंग षटकार! ३७७ च्या स्ट्राइक रेटसह अभिषेकचा मोठा धमाका

Quick Fire Innings For Punjab Captain Abhishek Sharma In SMAT 2025 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेआधी अभिषेक शर्मा देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत धमाक्यावर धमाका करताना दिसत आहे. पहिल्या दोन सामन्यात धावांसाठी संघर्ष करताना दिसलेल्या अभिषेक शर्मानं बंगालविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ५२ चेंडूत १४८ धावांची धमाकेदार खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. बडोदा संघाविरुद्ध १९ चेंडूत केलेल्या ५० धावांच्या खेळीनंतर आता पाँडेचेरी विरुद्धच्या सामन्यात त्याने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 ४ चौकार अन् ३ उत्तुंग षटकार! अभिषेकनं ३७७.७८ च्या स्ट्राइक रेटनं केल्या धावा   

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियवर रंगलेल्या सामन्यात पाँडेचरी विरुद्ध त्याने पंजाबच्या संघाला वादळी सुरुवात करून दिल्याचे पाहायला मिळाले. ९ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने त्याने ३७७.७८ च्या सरासरीसह ३४ धावा कुटल्या. ही खेळी मोठ्या धावसंख्येत रुपांतरीत करण्यात तो अपयशी ठरला. पण आपल्या IPL फ्रँचायझी संघाच्या घरच्या मैदानात त्याने या खेळीसह हवा नक्कीच केली. त्याची ही खेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तयार असल्याचे संकेत देणारी अशीच आहे. 

वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा

पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप ठरला, पण मोक्याच्या क्षणी फार्मात आला

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत अभिषेक शर्मा पंजाब संघाचे नेतृत्व करत आहे. हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात तो फक्त ३ चेंडूचा सामना करून एका चौकाराच्या मदतीने ४ धावांवर बाद झाला होता. हरयाणाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही अभिषेक शर्मा  एक ओव्हरही न खेळता ५ चेंडूत ६ धावांवर तंबूत परतला होता. एवढेच नाही तर हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यावरही तो बॅटिंगला आल्याचे पाहायला मिळाले नाही. दोन सामन्यातील त्याची कामगिरी टीम इंडियाचे टेन्शन वाढवणारी होती. पण आता मोक्याच्या क्षणी तो ट्रॅकवर आला आहे. 

सलामीवीराच्या रुपात फिक्स; प्रतिस्पर्धी संघासाठी 'रिस्क'

अभिषेक शर्मा याने आपल्या धमाकेदार अंदाजातील खेळीच्या जोकावर भारतीय टी-२० संघातील सलामीवीराची आपली जागा एकदम पक्की केली आहे. आशिया कप स्पर्धा गाजवल्यावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतही तो चमकला होता. आशिया कप स्पर्धेत ३०० पेक्षा अधिक धावा केल्यावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने ५ सामन्यातील ५ डावात १६३ धावांसह स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. 

Web Title : अभिषेक शर्मा की तूफानी पारी: 4 चौके, 3 छक्के, 377 का स्ट्राइक रेट!

Web Summary : अभिषेक शर्मा ने SMAT 2025 में शानदार प्रदर्शन किया, 9 गेंदों में 34 रन बनाए। शुरुआती विफलता के बाद, पंजाब के कप्तान ने फॉर्म में वापसी की, जिससे दक्षिण अफ्रीका श्रृंखला के लिए उनकी तैयारी का संकेत मिला।

Web Title : Abhishek Sharma's explosive innings: 4 fours, 3 sixes, 377 strike rate!

Web Summary : Abhishek Sharma shines in SMAT 2025, blasting 34 runs off 9 balls with a striking strike rate. After initial failures, the Punjab captain found his form, signaling readiness for the South Africa series with his aggressive batting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.