Qualification scenarios of Grop 1 in T20 World Cup : ऑस्ट्रेलियातील लहरी वातावरणाचा फटका काय असतो याची प्रचिती आज इंग्लंडला आली. आयर्लंडविरुद्धचा मेलबर्नवरील सामना केवळ ५ धावांच्या फरकाने त्यांना गमवावा लागला. डकवर्थ लुईस प्रणालीने आयर्लंडला विजयी घोषित करण्यात आले. यापाठोपाठ मेलबर्नवर होणारा न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. न्यूझीलंडने पहिल्याच सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियावर दणदणतीत विजय मिळवला होता आणि आजही ते सहज जिंकतील याची खात्री होती. पण, पावसाने त्यांच्याकडून एक गुण हिरावून घेतला अन् तो अफगाणिस्ताच्या पदरात टाकला.
पाऊस आला धावून, इंग्लंड गेला वाहून! ५ धावा कमी केल्या अन् आयर्लंडने विजय मिळवला
आजच्या दोन्ही निकालांमुळे ग्रुप १ची चुरस अधिक वाढली आहे. न्यूझीलंडचा संघ ३ गुण व +४.४५० नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे. श्रीलंका, इंग्लंड, आयर्लंड व ऑस्ट्रेलिया यांचेही प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. अफगाणिस्तानच्या खात्यात १ गुण जमा झाला. ग्रुप १ मधील सर्व संघांचे प्रत्येकी दोन सामने झाले आहेत आणि न्यूझीलंड हा एकमेव अपराजित संघ आहे. आता या संघांना प्रत्येकी ३ सामने खेळायचे आहेत आणि जो हे तीनही सामने जिंकेल तो या गटातून उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"