Babar Azam Reply To Reporter On Comparison With Virat Kohli : पाकिस्तान सुपर लीग २०२६ स्पर्धेतील सामन्यानंतर विराट कोहलीशी तुलना केल्याच्या मुद्यावरून बाबर आझम चर्चेचा विष ठरत आहे. पेशावर झल्मीचा कर्णधार असलेल्या बाबरने हैदराबाद किंग्समेनविरुद्ध शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर कोहलीप्रमाणे सामना फिनिश करण्याच्या त्याच्या क्षमतेबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बाबर आझमने स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. १४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या स्टार बॅटरनं ३७ चेंडूत ४३ धावांची उपयुक्त खेळी केली. या मॅच विनिंग खेळीनंतर त्याची तुलना थेट किंग कोहलीसी करण्यात आली. यावर बाबर आझमने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चित आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोहलीशी तुलना, बाबर आझम चिडला
PSL मधील लढतीनंतर बाबर आझमला विराट कोहलीसारखे मॅच फिनिश करण्यात अपयशी ठरतोस, असे म्हणत त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यावर बाबर म्हणाला की, या गोष्टी संपवा. या चर्चा तुमच्यापर्यंतच ठेवा. तुलना करणं बंद करा आणि पुढे चला. मी सामने फिनिश केले नाहीत, ही तुमची चुकीची समजूत आहे.”
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
टी-२० क्रिकेटमध्ये अपयशी
टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असलेल्या बाबर आझमची नेहमीच विराट कोहलीशी तुलना होताना पाहायला मिळाले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तो सातत्याने अपयशी ठरताना दिसला आहे. टी क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेटच्या मुद्यावरून तो सातत्याने ट्रोल हात असताना आता पुन्हा एकदा तो विराट कोहलीसोबत केलेल्या तुलनेमुळे चर्चेत आला आहे.
बाबरपेक्षा किंग कोहलीच भारी!
PSL च्या यंदाच्या हंगामात आतापर्यंत बाबरने दोन सामन्यांत १२६.१५ च्या स्ट्राईक रेटने ८२ धावा केल्या आहेत, ज्यात १० चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. दुसरीकडे, कसोटी आणि टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला Virat Kohli इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी खेळताना शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने दोन सामन्यांत ९७ धावा केल्या असून, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाबाद ६९ धावांची खेळी केली आहे. त्याचा स्ट्राइक रेट १७३.२१ इतका आहे. ही आकडेवारी किंग कोहली बाबरपेक्षा भारी आहे, हेच दाखवणारी आहे.
Web Summary : Babar Azam expressed displeasure at being compared to Virat Kohli after a PSL match. He urged critics to stop comparisons, asserting his ability to finish matches. Kohli's superior form in IPL highlights the contrast.
Web Summary : पीएसएल मैच के बाद विराट कोहली से तुलना होने पर बाबर आज़म ने नाराज़गी जताई। उन्होंने आलोचकों से तुलना बंद करने का आग्रह किया और मैच खत्म करने की अपनी क्षमता पर ज़ोर दिया। आईपीएल में कोहली का बेहतर प्रदर्शन अंतर को उजागर करता है।