ICC कडून T20 World Cup 2026 विजेत्या टीम इंडियासह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं? जाणून घ्या सविस्तर

ICC कडून ११.२५ मिलियन डॉलरची बक्षीस रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:38 IST2026-03-11T17:38:32+5:302026-03-11T17:38:32+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Prize money distribution for Men's T20WC 2026 announced Pakistan Get Rs 4-80 Crore From ICC As T20 World Cup Prize Money Winners India Receive This | ICC कडून T20 World Cup 2026 विजेत्या टीम इंडियासह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं? जाणून घ्या सविस्तर

ICC कडून T20 World Cup 2026 विजेत्या टीम इंडियासह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं? जाणून घ्या सविस्तर

ICC Men's T20 World Cup 2026 स्पर्धेतील दहावा हंगाम यजमान भारतीय संघाने गाजवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या फायनलमध्ये न्यूझीलंडला एकहाती पराभूत करत टीम इंडियाने तिसऱ्यांदा ट्रॉफी उंचावली. या विजयासह भारतीय संघाने अनेक विक्रम प्रस्थापित केले.भारत तीन वेळा टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. याशिवाय भारताने सलग दुसऱ्यांदा हा किताब जिंकण्याचा पराक्रम केला. या ऐतिहासिक विजयानंत भारतीय क्रिकेट नियमाक मंडळानं टीम इंडियाला १३१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. आता आयीसीसीने विजेत्या भारतीय संघासह स्पर्धेतील कोणत्या संघाला किती पैसे बक्षीस स्वरुपात देण्यात आले त्यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

ICC कडून ११.२५ मिलियन डॉलरची बक्षीस रक्कम

ICC ने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यातून दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२ स्पर्धेसाठी एकूण ११.२५ मिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे १३९ कोटी रुपये) इतकी बक्षीस रक्कम संघांमध्ये वाटण्यात आली. २०२४ मध्ये करण्यात आलेल्या विक्रमी वाढीच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम कायम ठेवण्यात आली आहे.

भारतीय संघाला मिळाली २४ कोटींहून अधिक रक्कम

विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाला २४ कोटी २८ लाख रुपये मिळाले. तर अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या न्यूझीलंडला सुमारे १३ कोटी रुपये मिळाले. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दक्षिणआफ्रिकेच्या संघाला सुमारे ९ कोटी रुपये, तर इंग्लंडच्या संघाला ८ कोटी रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले आहेत.

सुपर ८ मधील पाकिस्तानसह झिम्बाब्वेही मालामाल

सुपर ८ मध्ये प्रवास संपुष्टात आलेल्या पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेला प्रत्येकी ४ कोटी रुपये  बक्षीस स्वरुपात देण्यात आले आहे. श्रीलंकेचा संघ यजमान असल्यामुळे साखळी फेरीतून बाद झाल्यावर देखील त्यांना सुपर ८ मध्ये पोहचलेल्या संघाच्या बरोबरीनं ४ कोटी रुपये बक्षीस मिळाल्याचे दिसते.

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

  • भारत – २,६३९,४२३ डॉलर (₹२४,२८,४९,३५१)
  • न्यूझीलंड – १,४२२,६९२ डॉलर (₹१३,०८,९१,७८९)
  • दक्षिण आफ्रिका – १,००५,५७७ डॉलर (₹९,२४,८९,८५५)
  • इंग्लंड – ९७४,४२३ डॉलर (₹८,९६,४९,७४१)
  • वेस्ट इंडिज – ५३८,२६९ डॉलर (₹४,९५,१९,२२२)
  • पाकिस्तान – ५२२,६९२ डॉलर (₹४,८०,८६,१८२)
  • झिम्बाब्वे – ४९१,५३८ डॉलर (₹४,५२,२०,१०३)
  • श्रीलंका – ४७५,९६२ डॉलर (₹४,३७,८७,१५५)
  • अफगाणिस्तान – ३०९,८०८ डॉलर (₹२,८५,०१,२४८)
  • ऑस्ट्रेलिया – ३०९,८०८ डॉलर (₹२,८५,०१,२४८)
  • अमेरिका – ३०९,८०८ डॉलर (₹२,८५,०१,२४८)
  • स्कॉटलंड – २७८,६५४ डॉलर (₹२,५६,३५,१८९)
  • आयर्लंड – २७१,७३१ डॉलर (₹२,४९,९८,२९८)
  • इटली – २५६,१५४ डॉलर (₹२,३५,६२,७४८)
  • नेदरलँड्स – २५६,१५४ डॉलर (₹२,३५,६२,७४८)
  • यूएई – २५६,१५४ डॉलर (₹२,३५,६२,७४८)
  • नेपाळ – २५६,१५४ डॉलर (₹२,३५,६२,७४८)
  • कॅनडा – २२५,००० डॉलर (₹२,०६,९२,५७५)
  • नामिबिया – २२५,००० डॉलर (₹२,०६,९२,५७५)
  • ओमान – २२५,००० डॉलर (₹२,०६,९२,५७५)

Web Title: Prize money distribution for Men's T20WC 2026 announced Pakistan Get Rs 4-80 Crore From ICC As T20 World Cup Prize Money Winners India Receive This