कसोटी क्रिकेटमध्ये सेंच्युरी मारुन दाबात पदार्पण करणारा पृथ्वी शॉ सध्या संघर्षाचा सामना करताना दिसतोय. आयपीएलमध्ये अनसोल्ड राहण्याची नामुष्की ओढावल्यानंतर सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आलला नाही. ज्या पृथ्वी शॉची तुलना कधीकाळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत झाली त्याच्यासाठी मेगा लिलावात कुणी ७५ लाख बोलीही लावायचं धाडस दाखवलं नाही. खराब कामगिरीमुळे सोशल मीडियावरही तो ट्रोल होताना दिसतोय.
या परिस्थितीत केविन पीटरसन याने त्याला धीर दिल्याचेही पाहायला मिळते. या सर्व चर्चेत पृथ्वीच्या पहिले कोच संतोष पिंगुळकर यांची एक मुलाखत चर्चेत आली आहे. त्यांनी पृथ्वीच्या खेळीला लागलेल्या 'ग्रहण' दोषावर भाष्य केले आहे. जाणून घेऊयात त्यांनी खास मुलाखतीमध्ये युवा बॅटरसंदर्भात नेमकं काय म्हटलंय अन् पीटरसन यानं भारतीय बॅटरला काय सल्ला दिलाय त्यासंदर्भातील खास स्टोरी
अजूनही वेळ गेलेली नाही, पण...
'माय खेल'ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये पृथ्वीचे बालपणीचे कोच संतोष म्हणाले की, सध्याच्या घडीला तो फक्त २५ वर्षांचा आहे. वेळ अजूनही गेलेली नाही. जर त्याला स्पर्धात्मक क्रिकेट जगात टिकून राहायचे असेल तर कठोर मेहनत घ्यावी लागेल. तो ज्या चक्रव्यूव्हात अडकलाय त्याची कारणही त्यांनी बोलून दाखवली. क्रिकेटच्या बाहेरच्या सर्कलमधील वावर हा त्याच्यासाठी घातक ठरत आहे, असेही ते म्हणाले आहेत.
या गोष्टीमुळे पृथ्वी शॉ आलाय अडचणीत
मागील काही दिवसांपासून पृथ्वी शॉ क्रिकेटच्या जगातून बाहेरच्या दुनियेत वावरतानादिसते. तो एका वेगळ्या सर्कलमध्ये गेला असला तरी त्याचे क्रिकेटवरील प्रेम कमी झालेले नाही. पण ही गोष्टही खरीये की, तो आपल्या प्रेमाला यशस्वी करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यास कमी पडतोय. याच गोष्टींमुळे तो संघर्षाचा सामना करतो, असे मत संतोष पिंगुटकर यांनी व्यक्त केले आहे. लवकरात लवकर कमबॅक करण्यासाठी त्याला स्वत:ला प्रयत्न करावे लागतील, असा सल्लाही बालपणीच्या कोचने पृथ्वीला दिला आहे.
केविन पीटरसन यानं दिलाय हा सल्ला
इंग्लंडचा माजी क्रिकेटर पीटरसन याने युवा भारतीय सलामीवीर हा प्रतिभावंत क्रिकेटर आहे असं म्हटलं आहे. खेळाच्या मैदानातील काही सर्वोत्तम स्टोरीला कमबॅकची किनार असते. सोशल मीडियापासून दूर राहा. यशासाठी योग्य लोकांच्या संपर्कात राहा. फिट होऊन हिट शो देण्याचा मार्ग सहज सुलभ होईल, अशा आशयाची पोस्ट केविन पीटरसन याने पृथ्वीसाठी शेअर केली आहे.
Web Title: Prithvi Shaw's first coach Santosh Pingutkar Says He Love For Cricket But wasn't able to convert efforts Also Kevin Pietersen Give Advice
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.