Join us

T20 Mumbai 2025 : सगळं संपल्यावर आली जाग! सूर्यकुमार यादवच्या संघाविरुद्ध पृथ्वीनं ठोकली 'फिफ्टी'

स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आल्यावर शेवटच्या सामन्यात त्याची बॅट तळपल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:08 IST

Open in App

T20 Mumbai 2025 League Prithvi Shaw Smashes Fifty Against Suryakumar Yadav Team : टीम इंडियात कमबॅकसाठी धडपडत असलेल्या पृथ्वी शॉच्या भात्यातून अखेर धमाकेदार खेळी पाहायला मिळाली आहे. टी २० मुंबई लीग स्पर्धेतील १९ व्या सामन्यात भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या संघाविरुद्ध त्याने वादळी खेळीसह लक्षवेधून घेतले.  स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आल्यावर शेवटच्या सामन्यात त्याची बॅट तळपल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सुर्यकुमार यादवच्या संघाविरुद्ध पृथ्वीची धमाकेदार खेळी

आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेल्या पृथ्वी शॉ टी-२० मुंबई लीग स्पर्धेत नॉर्थ मुंबई पँथर्स संघाचे नेतृत्व करताना दिसतोय. पहिल्या काही सामन्यातील फ्लॉप शोनंतर सुर्यकुमार यादव कॅप्टन्सी करत असलेल्या ट्रायम्फ्स नाईट्स MNE संघाविरुद्ध  पृथ्वीनं ३४ चेंडूत ७५ धावा कुटल्या. या खेळीत त्याच्या भात्यातून १२ चौकार आणि ३ षटकार पाहायला मिळाले. 

आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!

दोनशेपारच्या लढाईत सूर्या दादाचा संघ कमी पडला

पृथ्वीच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर नॉर्थ मुंबई पँथर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २०७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील  Triumphs Knights MNE संघ १६९ धावांवर आटोपला. 

सूर्यकुमार यादवचा २५ प्लसचा सिलसिला कायम, पण...

धावांचा पाठलाग करताना ट्रायम्फ्स नाईट्स MNE संघाकडून सलामीवीर सिद्धांत  आद्धाथराव याने ४५ चेंडूत ७६ धावांची सर्वोच्च खेळी केली. आयपीएलमध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसलेला  सूर्यकुमार यादव या साममन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.  या सामन्यातही त्याने मैदानात उतरल्यावर २० पेक्षा अधिक धावा करण्याचा आपला सिलसिला कायम ठेवला. त्याने १६ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २९ धावा केल्या. पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरली नाही.  

दोन्ही संघ स्पर्धेतून 'आउट'

टी-२० मुंबई लीग स्पर्धेत पृथ्वीच्या संघासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघही सेमीच्या शर्यतीतून आउट झाला आहे. पृथ्वीच्या नॉर्थ मुंबई पँथर्सच्या संघाने ५ सामन्यापैकी २ विजय मिळवत फक्त ४ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. दुसरीकडे सूर्याच्या संघाने ५ सामन्यात फक्त एकच सामना जिंकला आहे.

टॅग्स :पृथ्वी शॉसूर्यकुमार अशोक यादवटी-20 क्रिकेट