ठळक मुद्देपंतने 92 धावा करत संघाची धावसंख्या वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. पण त्याचे शतक मात्र फक्त आठ धावांनी हुकले होते.
नवी दिल्ली : आयसीसीने आपली कसोटी क्रमवारी नुकतीच जाहीर केली असून यामध्ये भारताच्या पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांनी भरारी घेतली आहे. पृथ्वी आणि पंत या दोघांनिही या सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. या गोष्टीचाच फायदा या दोघांना क्रमवारीत झाला आहे.
पृथ्वीने पदार्पणाच्या सामन्यात दमदार शतक झळकावले होते. या शतकाच्या जोरावर पृथ्वीने 73वे स्थान पटकावले होते. दुसऱ्या सामन्यातही त्याने 70 आणि नाबाद 33 धावांची खेळी साकारली होती. या कामगिरीमुळे पृथ्वीने 13 स्थानांची कमाई करत थेट 60वे स्थान पटकावले आहे.
पंतने दुसऱ्या सामन्यात धडाकबाज फलंदाजी केली होती. पंतने 92 धावा करत संघाची धावसंख्या वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. पण त्याचे शतक मात्र फक्त आठ धावांनी हुकले होते. या खेळीमुळे पंतने 23 स्थानांची भरारी घेत 62वे स्थान पटकावले आहे.