Join us  

पंतप्रधान नरेंद्र मोदी विराट कोहलीला म्हणाले, 'Challenge Accepted'

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचं 'ते' चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 9:27 AM

Open in App

नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केले आहे. हे फिटनेस चॅलेंज त्यांनी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीलादेखील दिले होते. विराट कोहलीनं राज्यवर्धन सिंह राठोड यांचे चॅलेंज स्वीकारत पूर्णदेखील केले. फिटनेस चॅलेंज पूर्ण केल्यानंतर विराटनं आणखी तीन जणांना यामध्ये टॅग केले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं देखील आहे. कोहलीने पंतप्रधान नरेंद मोदी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि अनुष्का शर्मा यांना टॅग करुन हे चॅलेंज दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात गुरुवारी ट्विट करत म्हटले की, ''विराट कोहली मी तुमचं चॅलेंज स्वीकारत आहे. लवकरच मी माझा फिटनेस चॅलेंज व्हिडीओ शेअर करेन''. 

दरम्यान, विराटनं दिलेल्या चॅलेंजसंदर्भात अनुष्का शर्मा आणि एमएस धोनीकडून उत्तर अद्याप मिळालेलं नाही. विराटनं आपला फिटनेस चॅलेंज व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरदेखील केला आहे. 'मिस्टर राठोड मी तुमचं चॅलेंज स्वीकारत आहे', असे विराटनं व्हिडीओच्या सुरुवातीला म्हटले आणि एक्सरसाईज करण्यात सुरुवात केली.  व्हिडीओमध्ये कोहली स्पायडर प्लँक करताना दिसत आहे. एक्सरसाईज पूर्ण केल्यानंतर विराटनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, महेंद्रसिंह धोनी आणि पत्नी अनुष्का शर्माला त्यानं फिटनेस चॅलेंज दिलं.

(क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिले कोहली, सायना आणि ऋतिक रोशन यांना हे चॅलेंज)

राठोड यांनी आपला एक व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या कार्यालयातच पुश अप्स मारले आणि या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये तंदुरुस्तीबाबत जागृकता निर्माण करण्याचे काम केले आहे. यावेळी त्यांनी ' आपण फिट तर इंडिया फिट ' असा नाराही दिला आहे. 

 

टॅग्स :विराट कोहलीनरेंद्र मोदीफिटनेस टिप्स