Preity Zinta’s Punjab Kings Released Glenn Maxwell : आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी होणाऱ्या मिनी लिलावाआधी प्रीती झिंटाच्या सह मालकीच्या पंजाब किंग्सच्या संघाने ऑस्ट्रेलियन स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याला ठेंगा दाखवला आहे. रिटेन रिलीजच्या खेळात त्याच्यावर भरवसा न दाखवता पंजाब किंग्सच्या संघाने मिनी लिलावातील शॉपिंगसाठी पर्समध्ये कोट्यवधीची भर घालण्याला पसंती दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गत हंगामात पावणे नऊ लाखाला पडली एक धाव; PBKS नं दिला नाही भाव
२०२५ च्या हंगामाआधी झालेल्या मेगा लिलावात पंजाबच्या संघाने मॅक्सवेलसाठी ४.२ कोटी रुपये मोजले होते. मोठी किंमत मोजूनही त्याने हिंमत दाखवली नाही. गत हंगाम ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडून ८ सामन्यात ९७.९५ च्या सरासरीनं फक्त ४८ धावा काढल्या होत्या. त्याची एक धाव जवळपास पावणे नऊ लाखाला पडली होती. त्यामुळे पंजाबसाठी त्याच्यावर खेळलेला डाव घाट्याचा सौदा ठरला.
मॅक्सवेलसह पाच खेळाडूंना रिलीज केल्यावर पंजाबच्या पर्समध्ये किती रक्कम उरली?
पंजाब किंग्जच्या संघाने मॅक्सवेलसह जोस इंग्लिस, आरोन हार्डी, कुलदीप सेन आणि प्रवीण दुबे या खेळाडूंना रिलीज केले आहे. या खेळाडूंना रिलीज केल्यावर पंजाब संघाच्या पर्समध्ये आता ११.५ कोटी रुपये शिल्लक आहेत. यात त्यांना किमान ४ खेळाडूंची खरेदी करता येईल.
रिकी पाँटिंगनं शेअर केली त्याला रिलीज करण्यामागची गोष्ट
रिटेन-रिलीज खेळानंतर पंजाब संघाचा कोच रिकी पाँटिंग याने ग्लेन मॅक्सेवला रिलीज करण्यामागचं कारण अगदी स्पष्ट सांगितले. गत हंगामात आम्ही त्याच्याकडून चांगली कामगिरी करुन घेऊ शकलो नाही. आगामी हंगामातील सुरुवातीच्या काळात आम्ही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू शकलो नसतो. त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा होणार नाही, हे लक्षात आल्यावरच त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला, अशी आतली गोष्ट रिकी पाँटिंगनं शेअर केली आहे.पंजाब किंग्जने रिटेन केलेले खेळाडू
श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, प्रियांश आर्य, शशांक सिंह, अविनाश, हरनूर पन्नू, मुशीर खान, प्रभसिमरन सिंह, विष्णु विनोद, मार्कस स्टोयनिस, मार्को यान्सेन, अमतुल्लाह ओमरझाई, सूर्यांश शेडगे, मिशेल ओवेन, अर्शदीप सिंह, विशक विजयकुमार, यश ठाकुर, जेवियर बार्लेट, लॉकी फर्ग्यूसन, युझवेंद्र चहल, हरप्रीत बरार.
Web Summary : Punjab Kings released Glenn Maxwell before the IPL 2026 mini-auction. Poor performance and high cost led to the decision. Coach Ponting stated Maxwell wouldn't have made the playing XI.
Web Summary : आईपीएल 2026 की मिनी-नीलामी से पहले पंजाब किंग्स ने ग्लेन मैक्सवेल को रिलीज कर दिया। खराब प्रदर्शन और उच्च लागत के कारण यह निर्णय लिया गया। कोच पोंटिंग ने कहा कि मैक्सवेल प्लेइंग इलेवन में नहीं होते।