न्यूजीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) याने IPL 2026 च्या यंदाच्या हंगामाआधी फॅमिली फर्स्ट असे म्हणत सुरुवातीच्या टप्प्यातील सामन्यातून माघार घेतली आहे. प्रिती झिंटाच्या मालकीच्या पंजाब किंग्स संघाचा भाग असलेला लॉकी फर्ग्युसन नुकताच बाबा झाला आहे. त्यामुळे पत्नी आणि नवजात बाळासोबत वेळ घालवण्यासाठी त्याने IPL स्पर्धेतील यंदाच्या हंगामात उशीरा संघात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चार दिवस सुट्टी अन् मग नॅशनल ड्युटी
ऑकलंडमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी फर्ग्यूसनने स्पष्ट केले की, नवजात मुलगा आणि पत्नीसोबत घरी राहणे गरजेचे आहे. आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान काही दिवस त्याने सुट्टी घेतली होती. पण चार दिवसांतच तो पुन्हा राष्ट्रीय संघासोबत आपली ड्युटी बजावताना दिसला. आता त्याने IPL स्पर्धेआधी मोठा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी विंटर टूरसाठी ताजेतवाने होण्याचा विचार करत आहेत.
IPL मधून 'हे' ५ दिग्गज संघ का गायब झाले? एक तर विजेता..., पुण्याचे दोन संघ होते, वाचा रंजक इतिहास
फॅमिली फर्स्ट, मग IPL...
फर्ग्यूसनने सांगितले की, सध्याच्या क्रिकेटमध्ये सामने आणि लीग्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विश्रांतीसाठी योग्य वेळ निवडणे कठीण होते. वर्ल्ड कपदरम्यान पत्नी एकटीच बाळाची काळजी घेत होती. त्यामुळे आता कुटुंबासोबत वेळ घालवणे गरजेचे आहे.
प्रितीच्या पंजाब किंग्सचा प्लॅन-बी तयार
फर्ग्यूसनच्या अनुपस्थितीत प्रिती झिंटाच्या सह मालकीच्या पंजाबकडे पर्यायांची कमतरता नाही. संघ व्यवस्थापन ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज बेन ड्वॉरशुइस याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकते. त्याच्यासाठी पंजाब किंग्जच्या संघाने लिलावात ४.४ कोटी रुपये मोजले आहेत. याशिवाय अर्शदीप सिंग, मार्को यान्सेन, बार्टलेट, ओमरझाई आणि मार्कस स्टॉयनिस यांच्या रुपात पंजाबची गोलंदाजी एकदम तगडी असल्याचे दिसते.
IPL मधील कामगिरी
लॉकी फर्ग्युसन गेल्या दोन हंगामापासून २ कोटी मूळ किंमतीसह पंजाब किंग्सच्या संघासोबत आहे. याआधी त्याने कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे प्रतिनीधीत्व केले आहे. IPL मध्ये ४९ सामन्यात त्याच्या खात्यात ५१ विकेट्स जमा आहेत.