Join us

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

Australian female cricketers sexually assaulted Aqueel Khan arrested: वर्ल्डकप खेळण्यासाठी आलेल्या क्रिकेटर्सशी भारतात भरदिवसा केलेलं घाणेरडे कृत्य, एकीला केला होता वाईट स्पर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 19:07 IST

Open in App

Australian female cricketers sexually assaulted Aqueel Khan arrested: आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक सध्या भारतात सुरू आहे. या स्पर्धेत खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील दोन महिला खेळाडूंसोबत इंदोरमध्ये एक घाणेरडी घटना घडली होती. हॉटेल रेडिसन ब्लू येथून कॅफेकडे जात असताना, दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना अयोग्यरित्या स्पर्शही केला होता. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन संघाचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्या तक्रारीवरून एमआयजी पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. त्या तक्रारीवरून अकील खान या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

इंदोरच्या खजराणा रोडवरील प्रकार, ६ तासांत आरोपी ताब्यात

गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास खजराणा रोडवर ही घटना घडली होती. दोन्ही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एका कॅफेमध्ये (द नेबरहूड) जात होत्या. पांढरा शर्ट आणि काळी टोपी घातलेला एक दुचाकीस्वार त्यांच्या मागे लागला. तो वेगाने जवळ आला आणि एका महिला क्रिकेटपटूला अयोग्यरित्या स्पर्श केला. या घटनेने दोन्ही खेळाडू घाबरल्या आणि त्यांनी ताबडतोब ऑस्ट्रेलियन संघाचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवण्यात आली आणि इंदोर पोलिसांनी अकील खानला ताब्यात घेतले.

स्थानिक व्यक्तीने दिलेला खेळाडूंना धीर

दरम्यान, जेव्हा हा प्रकार घडला, तेव्हा खेळाडू अस्वस्थ असल्याचे पाहून जवळच असलेल्या कारमधील एक माणूस मदतीसाठी पुढे आला होता आणि त्याने त्यांना धीर दिला होता. त्या व्यक्तीने नंतर दोन्ही खेळाडूंच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लगेच पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. परदेशी खेळाडूंशी संबंधित या घटनेमुळे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. परदेशी नागरिकांशी छेडछाडीची घटना झाल्याने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने हाताळण्यात आले आणि सहा तासांच्या आत अकील खानला ताब्यात घेण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Aqueel Khan Arrested for Molesting Australian Women Cricketers in Indore

Web Summary : Aqueel Khan was arrested within six hours for sexually assaulting two Australian women cricketers in Indore. The incident occurred near Khajrana Road while the players were heading to a cafe. Police swiftly responded to the complaint filed by security officer Danny Simmons.
टॅग्स :आॅस्ट्रेलियागुन्हेगारी