ICC Under 19 World Cup Final PM Narendra Modi Congratulates Team India : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने झिम्बाब्वेच्या हरारेच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये इंग्लंडला हरवून सहाव्यांदा ICC U19 वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. दहाव्या प्रयत्नात सहावी ट्रॉफी जिंकणाऱ्या युवा टीम इंडियाने यंदाच्या हंगामात एकही सामना न गमावता ट्रॉफी उंचावली. फायनलमध्ये धावांची 'बरसात' करत विक्रमी विजयासह जेतेपद मिळवल्यावर वैभव सूर्यवंशीच्या धमाकेदार कामगिरीसह कर्णधार आयुष म्हात्रे आणि संघातील अन्य प्रतिभावंत खेळाडूंवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील खास ट्विट करत युवा खेळाडूंचे अभिनंद करत त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियासाठी PM मोदींचे खास ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून टीम इंडियाला शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे. यात त्यांनी भारतीय संघाच्या ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख हा भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावंत खेळाडूंची चमक दिसली अशा शब्दांत केला आहे. त्यांनी पुढे लिहिलं आहे की, भारतीय U-19 संघाने वर्ल्ड कप जिंकून देशाचं नाव उंचावलं, याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाने उत्कृष्ट कामगिरीसह अविश्वसनीय कौशल्य दाखवून दिले. हा विजय अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल. पुढील वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा!.
अपराजित युवा टीम इंडियाची अभिमानास्पद कामगिरी : राष्ट्रपती
सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील भारतीय संघाच्या विक्रमी सहाव्या वर्ल्ड कप विजेतेपदाबद्दल संघाचे अभिनंदन केले आहे. संपूर्ण स्पर्धेत संघ अपराजित राहिला, याचा खास उल्लेख करत त्यांनी भारतीय संघाची कामगिरी देशासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे सांगत खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
देशात आनंदोत्सव
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्याशिवाय उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही भारतीय संघाने ICC U-19 वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावल्याबद्दल अभिनंदन केले आहे. युवा खेळाडूंचा उत्साह, आनंद आणि प्रेरणा पाहून संपूर्ण देश हा विजय साजरा करत असल्याचा उल्लेख शहा यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केला आहे.
Web Summary : India's U-19 team, led by Aayush Mhatre, clinched their sixth World Cup title, defeating England. PM Modi and President Murmu congratulated the team for their undefeated run and exceptional performance, inspiring young athletes nationwide. The nation celebrates this victory.
Web Summary : आयुष म्हात्रे के नेतृत्व में भारत की अंडर-19 टीम ने इंग्लैंड को हराकर छठा विश्व कप खिताब जीता। पीएम मोदी और राष्ट्रपति मुर्मू ने टीम को उनकी अजेय दौड़ और असाधारण प्रदर्शन के लिए बधाई दी, जिससे देशभर के युवा एथलीटों को प्रेरणा मिली। राष्ट्र इस जीत का जश्न मना रहा है।