Mike Hesson On Babar Azam : पाकिस्तानचा स्टार बॅटर बाबर आझम सध्या धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकल्यावर वनडे मालिकेत धमक दाखवून त्याला आशिया कपसाठीच्या टी-२० संघात एन्ट्री मारण्याची संधी होती. पण वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेत ४७ धावा केल्यावर पुढच्या दोन सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला. परिणामी आशिया कपसाठी निवडलेल्या टी-२० संघात त्याला स्थान मिळाले नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बाबर आझमला कोचनं दिला सल्ला
आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाने बाबर आझमसह मोहम्मद रिझवान आणि नसीम शहा यांना टी-२० संघाबाहेर ठेवले आहे. भारताच्या यजमानपदाखाली युएईच्या मैदानात रंगणारी स्पर्धा ९ सप्टेंबरपासून रंगणार आहे. सलमान अली आगा याच्या नेतृत्वाखालील टी-२० संघात बाबरला स्थान न देणं हा एक कठीण निर्णय होता, असे मत संघ निवडीनंतर पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक मायकल हेसन याने म्हटले आहे. स्टार बॅटरला बाहेर ठेवण्यामागचं कारण सांगत त्यांनी या स्टार बॅटरला खास सल्लाही दिला आहे.
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
ऑस्ट्रेलियन मैदान गाजवून दाखव, मग बघू... नेमकं काय म्हणाले कोच?
बाबर आझम हा पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर आहे. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे तो टी-२० संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरतोय. त्याची टी-२० कारकिर्द संपल्यात जमा आहे, अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगू लागलीये. पण पाक संघाचे कोच मायकल हेसन यांनी त्याला मोठा दिलासा दिलाय. ते म्हणाले की, बाबर आझमला फिरकी गोलंदाजीचा सामना करण्यासोबतच स्ट्राइक रेटमध्ये सुधारणा करावी लागेल. जर ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये धमक दाखवली, तर भविष्यात त्याच्यासाठी टी-२० संघाचे दरवाजे निश्चितच उघडले जातील.
ही स्पर्धा बाबर आझमसाठी ठरेल महत्त्वाची, कारण...
ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेतील १५ व्या हंगामात बाबर आझम सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) सोबत करारबद्ध झाला आहे. जर त्याने या स्पर्धेत दमदार कामगिरी करून दाखवली तर त्याला पाकिस्तानच्या संघात कमबॅकची एक संधी मिळू शकते, असेच कोचनी म्हटले आहे. त्यामुळे बाबर आझमच्या दृष्टीने ही स्पर्धा अधिक महत्त्वपूर्ण ठरेल.
Web Title: Perform In BBL Pak Coach Mike Hesson Explains How Babar Azam Can Return To T20I Squad After Asia Cup Snub
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.