कंगना राणौतवर टीका करणारे त्यांचा खरा रंग दाखवतायत; भारतीय क्रिकेटपटूची बॅटिंग

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येमागचं सत्य सर्वांना जाणून घ्यायचंय...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 03:01 PM2020-07-22T15:01:48+5:302020-07-22T15:02:15+5:30

whatsapp join usJoin us
People Attacking Kangana Ranaut Are Showing Their True Colours: Manoj Tiwary | कंगना राणौतवर टीका करणारे त्यांचा खरा रंग दाखवतायत; भारतीय क्रिकेटपटूची बॅटिंग

कंगना राणौतवर टीका करणारे त्यांचा खरा रंग दाखवतायत; भारतीय क्रिकेटपटूची बॅटिंग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही विरोधात कंगना रणौतने तलवार उपसली आहे. सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली, असे कंगणाने म्हटले होते. एढेच नाही, तर तिने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनाही आपल्या निशाण्यावर घेतले होते. पण, तिच्यावर टीका होत आहे. आता कंगनाच्या बचावासाठी भारताच्या फलंदाजानं बॅटिंग केली आहे. 

कोरोना ही अल्लाहनं दिलेली शिक्षा, त्यापासून वाचायचं असेल तर...; खासदाराचं अजब लॉजिक

सावत्र भावानं 27 हजारांसाठी 13 वर्षांच्या बहिणीला विकलं, पण पुढे जे घडलं ते 'भन्नाट' होतं!

बंगालचा फलंदाज मनोज तिवारीनं कंगनावर टीका करणाऱ्यांना धारेवर धरले आहे. त्यानं ट्विट केलं की,''कंगना विरुद्ध इतर, हा सामना सुरूच राहणार आहे, परंतु तो सुरू असताना मुळ मुद्दा भरकटू नये, हिच अपेक्षा. सोयीस्करपणे लोकं रोज सकाळीत उठतात आणि कंगनावर टीका करायला सुरुवात करतात. जर तिला पाठींबा देऊ शकत नसाल, तर किमान तुमची तोंडं बंद करा.''

''कंगनाच्या विधानावर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःची परीक्षा करावी. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, जसं कर्म कराल, तसं फळ मिळेल. सुशांतच्या आत्महत्येमागचं सत्य देशाला जाणायचं आहे,''असंही तो पुढे म्हणाला.  




 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020चे स्थळ ठरले अन् आता तारीख, वेळही निश्चित झाली?; जाणून घ्या सर्व माहिती!

जगप्रसिद्ध मल्ल सादिक पंजाबी यांचे पाकिस्तानात निधन 

ग्राऊंडस्टाफच्या मदतीसाठी पुढे आला 'सचिन'; करतोय राशनचं वाटप! 

IPL 2020 पूर्वी टीम इंडिया 'या' देशाविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार? BCCIवर वाढता दबाव

विराट कोहलीचा RCB जिंकू शकतो IPL 2020; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं सांगितलं 'भारी' लॉजिक!

 

Read in English

Web Title: People Attacking Kangana Ranaut Are Showing Their True Colours: Manoj Tiwary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.