ग्राऊंडस्टाफच्या मदतीसाठी पुढे आला 'सचिन'; करतोय राशनचं वाटप!

कोरोना व्हायरसमुळे केवळ क्रीडा स्पर्धाच नव्हे, तर त्याच्याशी संबंधित सर्वांनाच फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले असले तरी भारतात अजूनही क्रिकेटला सुरुवात झालेली नाही.

तरीही खेळपट्टी तयार केल्या जात आहेत आणि त्यांची निगा राखण्यासाठी ग्राऊंडस्टाफ मेहनत घेत आहेत. त्यांच्या मदतीसाठी केरळचा क्रिकेटपटू सचिन बेबी यानं पुढाकार घेतला आहे.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार सचिन बेबी येथील सेंट पॉल कॉलेजच्या ग्राऊंडस्टाफमधील प्रत्येक सदस्यांना 20 किलो तांदूळ, दोन किलो साखर आदी अन्य महत्त्वाच्या गोष्टी वाटत आहे.

सचिन बेबीनं सांगितले की,''आमच्या धावांमागे अन् विकेट्समागे या ग्राऊंडस्टाफची मेहनत आहे. त्यांना विसरून कसे चालेल. पैशांपेक्षा दोन वेळचं जेवण अधिक महत्त्वाचे असते.

त्यामुळेत या ग्राऊंडस्टाफना राशन देण्याचा निर्णय मी घेतला. अन्य खेळाडूही पुढाकार घेऊन अशीच मदत करतील अशी अपेक्षा.