IPL 2026 PBKS VS GT Live : गिल अन् अय्यरच्या संघांत रंगणार सामना; जाणून घ्या कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड?

गिलसाठी महत्त्वपूर्ण असेल यंदाचा IPL हंगाम, श्रेयस अय्यरसमोर घरच्या मैदानात जिंकण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:45 IST2026-03-31T16:35:05+5:302026-03-31T16:45:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
PBKS vs GT IPL 2026 Live Cricket Streaming Online: Where to Watch Punjab Kings vs Gujarat Titans Match Live Start Time, Venue, Squads and More | IPL 2026 PBKS VS GT Live : गिल अन् अय्यरच्या संघांत रंगणार सामना; जाणून घ्या कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड?

IPL 2026 PBKS VS GT Live : गिल अन् अय्यरच्या संघांत रंगणार सामना; जाणून घ्या कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड?

IPL 2026 PBKS VS GT Live Streaming :  आयपीएल २०२६ स्पर्धेतील श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज आणि  शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स यांच्यातील चौथा सामना मुल्लानपूरच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार असलेला गिल, आपल्या टी-२० कारकिर्दीत संघर्षाचा सामना करत आहे. दोन्ही संघातील हा सामना कुठं आणि कसा पाहता येईल? कसा आहे दोन्ही संघाचा एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड आणि कोणत्या खेळाडूंवर असतील नजरा? जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

गिलसाठी महत्त्वपूर्ण असेल यंदाचा IPL हंगाम, कारण...

भारताचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिलसाठी यंदाचा हंगाम स्वत:ला सिद्ध करण्याची अग्नपरीक्षाच आहे.  २०२३ पासून धावांच्या बाबतीत गिल विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर असूनही, टी-२० क्रिकेटमध्ये तो फिका ठरला आहे. परिणामी त्याला टी-२० वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. आता IPL मध्ये तो आपला क्लास दाखवून फलंदाजीसह नेतृत्वातील कर्तृत्व दाखवून देणार का? ते पाहण्याजोगे असेल. कॅप्टन शुभमन गिलशिवाय साई सुदर्शन हा गुजरातच्या फलंदाजीचा कणा आहे. या खेळाडूवरी सर्वांच्या नजरा असतील. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत फ्लॉप ठरलेला बटलर गुजरातच्या ताफ्यातून रंगात दिसणार का? हा देखील एक मोठा प्रश्नच आहे.

रेकॉर्ड ब्रेकर वैभव सूर्यवंशी! IPL स्पेशलिस्ट रैनासह अभिषेक, ईशान आणि ट्रॅविस हेडचा विक्रम मोडला

श्रेयस अय्यरच्या संघासमोर घरच्या मैदान मारण्याचे आव्हान

श्रेयस अय्यरनं आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वाची खास छाप सोडली आहे. गत हंगामात उपविजेता असलेला पंजाबचा संघासमोर सलामीच्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळवण्याचे तगडे आव्हान असेल. कारण गत हंगामात न्यू चंदीगडच्या मैदानात पाच पैकी फक्त दोन सामन्यातच त्यांना विजय मिळवता आला होता. पंजाबची आक्रमक सलामीची जोडी, प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य, महत्त्वाची ठरेल, मात्र त्यांचा अलीकडील फॉर्म चिंतेचा विषय आहे. रशीद खानच्या फिरकीचा सामना करण्याचे मोठे चॅलेंज मधल्या फळीतील फलंदाजांवर असेल.  

पंजाब आणि गुजरात यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड

पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत आयपीएलमध्ये ६ सामने खेळवण्यात आले आहेत. यात ३ सामने हे पंजाबने तर ३ सामन्यात गुजरातच्या संघाने बाजी मारली आहे. २४३ ही दोन्ही संघातील सर्वोच्च धावसंख्या असून पंजाबच्या संघाने ही मोठी धावसंख्या उभारली होती. निच्चांकी १४२ धावासंख्याही पंजाबच्या नावेच आहे.
 
गुजरात टायटन्स संघ : 

साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, राहुल तेवतिया, एम शाहरुख खान, रविश्रीनिवासन साई किशोर, राशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, जयंत यादव, सन वूडटन, सन वूडटन, जयंत यादव, सन वूडटन, जयंत यादव. कुलवंत खेजरोलिया, अनुज रावत, मानव सुथार, कुमार कुशाग्रा, अर्शद खान, गुरनूर ब्रार, निशांत सिंधू, अशोक शर्मा.

पंजाब किंग्ज संघ : 

प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक फलंदाज), श्रेयस अय्यर (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, बेन द्वारशुईस, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्को जॅनसेन, विजयकुमार विशाक, विगुनू, विगुन, लॉकन, लॉकन, विशन, बेन द्वारशुईस. झेवियर बार्टलेट, यश ठाकूर, नेहल वढेरा, हरप्रीत ब्रार, कूपर कोनोली, मिशेल ओवेन, हरनूर सिंग, मुशीर खान, पायला अविनाश, विशाल निषाद.

PBKS vs GT यांच्यातील सामना कधी अन् कुठं रंगणार? 

  • सामन्याची तारीख: मंगळवार, ३० मार्च, २०२६ 
  • वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
  • सामन्याचे ठिकाण : महाराजा यादविंद्रसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, न्यू चंदीगड

भारतामध्ये कुठे पाहता सामना येईल?

  • जिओहॉटस्टार ॲप /वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग
  • स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल्सवर थेट प्रसारण

Web Title : IPL 2026: PBKS बनाम GT मुकाबला, मुख्य खिलाड़ी और रिकॉर्ड्स

Web Summary : पंजाब किंग्स और गुजरात टाइटन्स IPL 2026 में आमने-सामने। गिल का लक्ष्य टी20 क्षमता साबित करना, जबकि अय्यर घरेलू मैदान पर लाभ चाहते हैं। इस बहुप्रतीक्षित मैच के लिए मुख्य खिलाड़ियों और हेड-टू-हेड रिकॉर्ड का विश्लेषण किया गया है।

Web Title : IPL 2026: PBKS vs GT Clash Preview, Key Players, and Records

Web Summary : Punjab Kings and Gujarat Titans face off in IPL 2026. Gill aims to prove his T20 prowess, while Iyer seeks home ground advantage. Key players and head-to-head records are analyzed for this anticipated match.