Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल

Smriti Mandhana and Palash Muchhal Relationship: भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि तिचा माजी प्रियकर पलाश मुच्छल यांच्या ऐनवेळी मोडलेल्या लग्नाची चर्चा क्रिकेट आणि मनोरंजन जगतामध्ये मोठ्या प्रमाणात झाली होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:44 IST

Open in App

भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि तिचा माजी प्रियकर पलाश मुच्छल यांच्या ऐनवेळी मोडलेल्या लग्नाची चर्चा क्रिकेट आणि मनोरंजन जगतामध्ये मोठ्या प्रमाणात झाली होते. गतवर्षी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे दोघांचा विवाह सोहळा पार पडणार होता. त्यासाठी मोठी तयारीही करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी हे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं होतं. तसेच पुढे हे लग्न रद्द करण्यात आलं होते.  त्यानंतर पलाशने आपली फसवणूक केल्याचा आरोप स्मृतीने केला होता. तसेच दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोदेखील केलं होतं. मात्र आता या दोघांमधील दुरावा मिटल्याचे दावे करण्यात येत आहेत.

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून स्मृती मंधाना हिचे वडील आणि पलाश मुच्छलची बहीण पलक यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे. तसेच स्मृती मानधना आणि पलाश मुश्चल पुन्हा एकत्र आले अन, ते लवकरच लग्न करणार आहेत, असा दावाही केला जात आहे.

दरम्यान, समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये स्मृती मानधनाचे वडील हे मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये पलाश मुच्छलची बहीण पलक मुच्छल आणि तिचे पती मिथून यांना भेटताना दिसत आहे. एवढंच नाही तर पलक मुच्छल ही स्मृती मानधनचाचे वडील श्नीनिवास यांना नमस्कार करताना दिसत आहे. मात्र पलक मुच्छल आणि स्मृती मंधानाच्या वडिलांच्या भेटीचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ हल्ली चित्रित केलेला आहे की जुना आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र या व्हिडीओंनी क्रिकेटप्रेमींचं लक्ष मात्र निश्चितपणे वेधून घेतलं आहे. तसेच स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या कुटुंबीयांना लग्नावेळी आलेला दुरावा मिटवून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे का, अशी विचारणा लोकांकडून केली जात आहे.

एकीकडे या व्हिडीओबाबत चर्चांना उधाण आले असले तरी दोन्ही कुटुंबीयांनी या कथित भेटीबाबत कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. लग्नाची तयारी झाली असतानाच पलाश मुच्छल याच्यावर तो स्मृती मानधना हिची फसवणूक करत असल्याचा आरोप झाला होता.  एकीकडे लग्नाचा सोहळा सुरू असतानाच पलाश हा एका तरुणीसोबत बेडवर सापडला होता, असा दावा स्मृतीच्या निकटवर्तीयांनी केला होता. पलाशने हे आरोप फेटाळले होते. मात्र  या आरोपांनंतर स्मृती आणि पलाशमधील लग्न सुरुवातीला पुढे ढकलण्यात आलं होतं. तसेच पुढे हे लग्न मोडलं होते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Smriti Mandhana and Palash Muchhal: Reconciliation rumors after family photo?

Web Summary : Speculation rises about Smriti Mandhana and Palash Muchhal's reconciliation after a viral video shows their families meeting, despite a previously called-off wedding and allegations of infidelity. Both families remain silent.
टॅग्स :स्मृती मानधनाभारतीय महिला क्रिकेट संघरिलेशनशिप