नवी दिल्ली : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्ताने भारत सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. देशभरातील अनेक कलाकारांसह भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनीही या मोहिमेत सहभाग घेतला आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये तो तिरंगा फडकवताना दिसत आहे. सचिन म्हणतो की, ‘तिरंगा नेहमीच आपल्या हृदयात राहिला आहे आणि आज माझ्याही घरी फडकत आहे. दिल में भी तिरंगा और घर में भी तिरंगा, जय हिंद !,’ असे सचिनने म्हटले. कर्णधार रोहित शर्माने आपल्या प्रोफाइलवर तिरंग्याचा फोटो लावला, तर माजी क्रिकेटपटू सुरैश रैनानेही तिरंग्याचा फोटो लावून तमाम देशवासीयांना या मोहिमेत सहभागी होण्यास सांगितले.
माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीर, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, माजी अष्टपैलू यांनीही हर घर तिरंगा मोहिमेत आपला सहभाग दाखवला आहे.