Join us

"ती तयार असेल तर लग्न करेन...", उर्वशी रौतेलासोबतच्या चर्चांवर पाकिस्तानी क्रिकेटरचं विधान

urvashi rautela and naseem : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असते. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 16:02 IST

Open in App

Naseem Shah On Wedding With Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे नाव अनेकदा भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसोबत जोडले गेले आहे. अलीकडेच उर्वशी रौतेलानेपाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहला अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, ज्यानंतर तिचे आणि नसीमचे अफेयर असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता खुद्द नसीम शाहने एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

उर्वशीसोबत लग्न करण्यासाठी तयार - नसीम शाहएका मुलाखतीत पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहला उर्वशी रौतेलासोबत लग्न करणार का असा प्रश्न विचारला असता त्याने म्हटले, "जर मी मेसेज दिला तर तुम्ही तो व्हायरल कराल. पण जर नवरी तयार असेल तर मी लग्न करण्यासाठी तयार आहे." नसीम शाहचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

१५ फेब्रुवारी २०२३ रोजी नसीम शाहने त्याचा २०वा वाढदिवस साजरा केला. तेव्हा तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या आपल्या सहकाऱ्यांसोबत जन्मदिवस साजरा करत होता. अशातच जेव्हा नसीम शाहने पाकिस्तानी क्रिकेटर शादाब खानच्या लग्नाबद्दल कमेंट केली तेव्हा उर्वशी रौतेलाने कमेंटच्या माध्यमातून नसीमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. उर्वशीच्या शुभेच्छांचा स्वीकार करत नसीमने देखील तिचे आभार मानले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :पाकिस्तानसेलिब्रिटीउर्वशी रौतेलादिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टलग्न
Open in App