Saim Ayub Bags His Third Consecutive Duck In Asia Cup 2025 : यूएई विरुद्धच्या सामन्याआधी खेळायचं की, नाही या नाट्यानंतर पाकिस्तानचा संघ अखेर मैदानात उतरला. नियोजित वेळेपेक्षा एक तास उशीराने सुरु झालेल्या 'करो वा मरो'च्या लढतीत UAE संघाचा कर्णधार मुहम्मद वसीमनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जुनैद सिद्दीकी याने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत पाकिस्तानला धक्कावर धक्के दिले. पाकिस्तानचा युवा सलामीवीर सईम अयूब पुन्हा एकदा खातेही न उघडता तंबूत परतला. सलग तिसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला आहे. आशिया कप स्पर्धेत त्याच्या नावे सलग शून्यावर बाद होण्याची लाजिरवाण्या हॅटट्रिकची नोंद झालीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अशी नामुष्की ओढावणारा तो पाकिस्तानचा तिसरा फलंदाज
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा शून्यावर बाद होणारा पाकिस्तानचा तो तिसरा फलंदाज ठरला. याआधी अब्दुल शफीकवर चार वेळा शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली होती. याशिवाय मोहम्मद हफीज ३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. आशिया कप स्पर्धेआधी पाकिस्तान संघ यूएईच्या मैदानात तिरंगी टी-२० मालिका खेळला होता. या मालिकेतही सईम अयूब एका सामन्यात शून्यावर बाद झाला होता. मागील ६ डावात त्याच्यावर चौथ्यांदा शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावलीये.
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
पाकिस्तानकडून T20I मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज
१० – उमर अकमल (७९ डाव)
८ – शाहिद आफ्रिदी (९० डाव)
८ – सईम अयूब (४४ डाव)*
बॅक टू बॅक ओव्हरमध्ये जुनैदनं दोन्ही PAK च्या दोन्ही सलामीवीरांना दाखवला तंबूचा रस्ता
यूएई विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात मोठा फटका मारण्याचा नादात सैम अयूब फसला. पाकिस्तानच्या धावफलकावर ३ धावा असताना जुनैदनं पाचव्या चेंडूवर त्याला तंबूचा रस्ता दाखवला. एवढ्यावरच जुनैद थांबला नाही. पुढच्या षटकात त्याने साहिबजादा फरहानच्या रुपात पाकच्या दुसऱ्या सलामीवीरालाही आपल्या जाळ्यात अडकवले. तो १२ चेंडूत ५ धावा करून माघारी फरिला. UAE विरुद्ध तिसऱ्या षटकात पाकिस्तानच्या संघाने ९ धावांवर दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: Pakistan vs United Arab Emirates 10th Match Saim Ayub Bags His Third Consecutive Duck In The Asia Cup 2025 Junaid Siddique
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.