Pakistan Vs UAE Asia Cup Live Streaming, When And Where To Watch Knockout Match : दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर १७ सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिराती यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील 'अ' गटातील अखेरचा सामना नियोजित आहे. या सामन्यावर अनिश्चिततेचे सावट आहे. कारण टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यानंतर वादग्रस्त ठरलेल्या हस्तांदोलन प्रकरणानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) मॅच रेफरी अँडी पाइक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IND vs PAK यांच्यातील सामन्यात भारताची बाजू घेणाऱ्या मॅच रेफरींना हटवा नाहीतर उर्वरित स्पर्धेवर बहिष्कार टाकू, अशी धमकी पाकिस्तानकडून देण्यात आली. पण ICC नं ही मागणी फेटाळली. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाची UAE विरुद्धच्या सामन्याआधी होणारी पत्रकार परिषेद रद्द करण्यात आली. त्यांचा बहिष्कार एवढ्यापुरताच राहणार की, मॅचसंदर्भात ते असाच निर्णय घेणार ते पाहण्याजोगे असेल.
यजमान यूएईच्या संघाला हलक्यात घेणं पाकसाठी ठरू शकतं धोक्याचं; कारण...
एवढेच नाहीतर 'अ' गटातील PAK अन् UAE यांच्यातील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्याला नॉकआउटचं स्वरुप आले आहे. या सामन्यात जो संघ पराभूत होईल, तो स्पर्धेतून बाद होईल. त्यामुळेच पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात यजमानपद UAE संघ जोर लावून आशिया चषक स्पर्धा अविस्मरणीय करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. पाकिस्तानचा UAE विरुद्धचा रेकॉर्ड चांगला असला तरी UAE च्या संघाला हलक्यात घेणं त्यांच्यासाठी धोक्याचं ठरू शकते. आतापर्यंत दोन्ही गटातून फक्त एकमेव भारतीय संघच सुपर-४ साठी पात्र ठरला आहे.
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
कुठं अन् कसा पाहता येईल PAK vs UAE यांच्यातील सामना? (Pakistan Vs UAE Live Streaming And Telecast)
आशिया चषक स्पर्धेतील सर्व सामन्यांचे प्रसारण हक्क सोनी स्पोर्ट्सकडे आहेत. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध यूएई यांच्यातील सामना हा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या भाषेतील चॅनेलवर पाहता येईल. मोबाईलच्या माध्यमातून SonyLiv अॅप आणि वेबसाईटवर स्ट्रिमिंग उपलब्ध असेल.
कसा आहे PAK vs UAE यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड?
आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये या दोन संघात फक्त दोनच टी-२० सामने खेळवण्यात आले होते. आशिया चषक स्पर्धेआधी झालेल्या यूएई-अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या तीन संघातील तिरंगी टी-२० मालिकेत पाकिस्तान विरुद्ध यूएई हे दोन संघ समोरासमोर आले होते. दोन्ही सामन्यात पाकिस्तानच्या संघाने ३१ धावांनी विजय मिळवला होता. पाकविरुद्ध खेळण्याचा अनुभव नसताना UAE नं त्यांना चांगली फाइट दिली होती. त्यामुळेच तिसऱ्या सामन्यात ते पलटवारही करू शकतात. जर तसे झाले तर आशिया चषक स्पर्धेतील हा सर्वात मोठा उलटफेर करणारा निकाल ठरेल.
Web Title: Pakistan Vs UAE Asia Cup Live Streaming When And Where To Watch Knockout Match Know PAK vs UAE Head To Head T20I Reords
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.