Pakistan Squad For West Indies Babar Azam Not In T20I Squad : पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. कॅरेबियन दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखालील संघाची घोषणा केली आहे. पण पुन्हा एकदा बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या स्टार फलंदाजांना टी-२० क्रिकेट संघातून बाहेरच ठेवण्यात आले आहे. बाबर आझम टी-२० संघात स्थान मिळवण्यात संघर्ष करत असल्यामुळे सध्यातरी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये हिटमॅन रोहित शर्मा अजूनही आघाडीवर आहे. हा एक वर्ल्ड रेकॉर्डच आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडेत संधी मिळाली, पण टी-२० संघातून दोघांचा पत्ता कट
कॅरेबियन दौऱ्यासाठी पाकिस्तान वनडे संघाचे नेतृत्व हे मोहम्मद रिझवानकडे देण्यात आले असून या संघात बाबर आझमचाही समावेश आहे. पण सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील टी-२० संघात मात्र ना वनडेचा कॅप्टन दिसतो ना स्टार बॅटर बाबर आझमला संधी मिळालीये. मागील काही दिवसांपासून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान ही हिट जोडी राष्ट्रीय टी-२० संघातून बाहेर आहे.
Most Run Scorers In Test: जो रुटनं साधला मोठा डाव; कॅलिस-द्रविडला टाकलं मागे, सचिन टॉपला
बाबरच्या टप्प्यात आहे हिटमॅनचा वर्ल्ड रेकॉर्ड, पण ...
आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा अव्वलस्थानी आहे. त्याने २०२४ च्या टी २० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर छोट्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मानं १५९ सामन्यातील १५१ डावात ४२३१ धावा केल्या आहेत. बाबर आझमनं २०१६ ते २०२४ या कालावधीत १२८ सामन्यातील १२१ डावात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ४२२३ धावा केल्या आहेत. हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडित काढण्यापासून तो फक्त ९ धावा दूर आहे. पण आता तो पाकिस्तान टी-२० संघ बांधणीचा भागच नाही. त्यामुळे रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड एकदम सेफ असल्याचे दिसून येते.
बाबरसह काही सिनीयर्स पाक क्रिकेटर्सची टी-२० कारकिर्द संपल्यात जमा
पाकिस्तान संघ २०२६ मध्ये होणाऱ्या आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ बांधणी करत आहे. कोच माइक हेसन आणि कर्णधार सलमान अली आगा यांच्यासह टी-२० संघात संघात नव्या पर्वाची सुरुवात झालीये. बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि नसीम शाह यांसारख्या खेळाडूंना वगळून नवा संघ तयार केला जात आहे. पाकिस्तान टी-२० क्रिकेटमधील हा विचार बाबरसह पाकच्या अन्य काही स्टार क्रिकेटर्सचे टी-२० कारकिर्द संपल्यात जमा झाल्यागत आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पाकिस्तानचा वनडे संघ
मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आगा, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, फखर जमाँ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, मोहम्मद हॅरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, सॅम अयूब, शाहीन शाह आफ्रिदी आणि सुफयान मोकिम.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पाकिस्तानचा टी २० संघ :
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमाँ, हॅरिस राउफ, हसन अली, हसन नवाझ, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हॅरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, साहिबजादा फरहान (विकेटकीपर), सईम अयूब, शाहीन शाह आफ्रिदी आणि सुफियान मोकिम.