VIDEO: तिरंगा घेऊन आला म्हणून फॅनची कॉलर धरली, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दाखवला माज

Indian Flag fan in Pakistan Stadium viral video: तिरंगा घेऊन पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये पोहोचला होता चाहता, पुढे खूप काही घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:42 IST2025-02-25T19:40:13+5:302025-02-25T19:42:18+5:30

whatsapp join usJoin us
Pakistan officials misbehaved with Indian fan with indian flag tricolor threw him out of stadium video viral | VIDEO: तिरंगा घेऊन आला म्हणून फॅनची कॉलर धरली, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दाखवला माज

VIDEO: तिरंगा घेऊन आला म्हणून फॅनची कॉलर धरली, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दाखवला माज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Flag fan in Pakistan Stadium viral video: पाकिस्तानात तब्बल २९ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानातील तीन शहरांमध्ये खेळवले जात आहेत. पाकिस्तान या स्पर्धेचा यजमान असला तरीही चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने मात्र पाकिस्तानबाहेर दुबईत खेळले जात आहेत. सुरक्षेचा मुद्दा पुढे करत भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने, ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळली जात आहे. या स्पर्धेचे सामने रावळपिंडी, कराची आणि लाहोर येथे खेळवले जात आहेत. भारताचा संघ पाकिस्तानात नसला तरीही सर्व आठ संघांचे ध्वज लावणे बंधनकारक असल्याने भारताचा ध्वज पाकिस्तानात डौलाने फडकतोय. पण याचदरम्यान, एका चाहत्याने सामन्यात भारताचा तिरंगा आणल्यामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याच्याशी वाईट वर्तणूक केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो पाहून प्रत्येक भारतीयाला नक्कीच राग येईल.

तिरंगा घेऊन चाहता लाहोरच्या स्टेडियममध्ये, व्हिडिओ व्हायरल

लाहोरमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये भारतीय चाहत्याशी गैरवर्तन केले जात आहे. त्याला स्टेडियमबाहेर फेकण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पाकिस्तानवर टीका केली जात आहे. लोक पाकिस्तानच्या वर्तणुकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. या घटनेचा लोकांनी निषेध केला आहे आणि सोशल मीडियावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा सामना लाहोरमध्ये खेळला गेला. यावेळी सामन्यादरम्यान लोकांचे लक्ष एका चाहत्याकडे गेले. त्याच्या हातात तिरंगा होता. तो लाहोरमध्ये तिरंगा हातात घेऊन ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामना पाहत होता. हे पाहून सुरक्षारक्षक व अधिकाऱ्यांचा तीळपापड झाला. त्यांनी त्याची कॉलर पकडून त्याला खेचले आणि त्यानंतर त्याला स्टेडियममबाहेर काढले.

दरम्यान, या व्हिडीओबाबत अद्याप पाकिस्तानकडून काहीही स्पष्टीकरण आलेले नाही.

Web Title: Pakistan officials misbehaved with Indian fan with indian flag tricolor threw him out of stadium video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.