Join us

Pakistan Afridi Daughter: पाकिस्तानी क्रिकेटरची लेक रूग्णालयात देतेय मृत्यूशी झुंज; फोटो पोस्ट करुन दिली माहिती

'माझ्या मुलीसाठी प्रार्थना करा', असं आवाहन त्याने केलंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 12:17 IST

Open in App

Pakistan Afridi Daughter: पाकिस्तानचा क्रिकेटपटू आसिफ आफ्रिदीने चाहत्यांना आपल्या मुलीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. आसिफ आफ्रिदीने एक फोटो पोस्ट केला आहे. आसिफ आफ्रिदीची मुलगी रुग्णालयात दाखल आहे आणि तिची प्रकृती गंभीर आहे. आसिफ आफ्रिदीने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नसले तरी तो बराच काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. आसिफ आफ्रिदीने आपल्या मुलीचा फोटो पोस्ट केल्यावर चाहते आणि सहकारी क्रिकेटर्स भावूक झाले आहेत. सलमान बट, उमर गुल यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी मुलीच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केली असून आफ्रिदीनेही लोकांना, लेकीच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

आसिफ आफ्रिदीची क्रिकेट कारकीर्द

आसिफ आफ्रिदीने २००९ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र आंतरराष्ट्रीय संघात त्याला आपले स्थान निर्माण करता आले नाही. या वर्षी आसिफ पाकिस्तान सुपर लीग २०२२ मध्ये मुलतान सुलतानकडून खेळला. आसिफने पाच सामन्यांमध्ये ८ विकेट घेतल्या आणि या दरम्यान त्याने सरासरी (प्रत्येक षटकात) ८ पेक्षा कमी धावा दिल्या. अलीकडेच ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला तेव्हा संघात स्टँडबाय खेळाडू म्हणूनही त्याला संघात समाविष्ट करण्यात आले होते. पण त्याला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळवता आले नाही.

टॅग्स :पाकिस्तानसोशल मीडियासामाजिक
Open in App